प्रवीण गोंगले / चंद्रपूर /--- चंद्रपूर जिल्ह्यात तापमान वाढू लागल्यावर
वन्यजीवांची काहिली सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्ह्यातील
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर जवळ उमा नदीच्या पात्रात एक पूर्ण वाढीची
वाघीण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी या भागातील
नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाल
दिली. वरिष्ठ वनाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी केली. यात ही
एक ५ वर्षे वयाची वाघीण असल्याचे आढळून आले आहे.
http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2262
मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत मात्र वनविभाग मौन बाळगून आहे. पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या अवस्थेतील हा मृत्यू विषबाधेने झाला की एखाद्या अन्य वाघाशी झालेल्या झुंजीत या बाबत सखोल तपास केला जात आहे.

Post a Comment