BREAKING NEWS

Friday, April 8, 2016

शिक्षक महासंघाच्या अमरावती शहराध्यक्षपदी (महिला) सौ. मायाताई वाकोडे. 🔸🔹 शैक्षणीक क्षेत्रातील आरीष्ठ्य रोखण्यासाठी व जळमटे नष्ठ करण्यासाठी गुडीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर नियुक्ती 🔸🔹

 🔸🔹 अमरावती 🔸🔹 /-- शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक विरोधी कारवायांनी प्रवेश घेतला असुन शैक्षणीक क्षेत्राचे पावित्र्य अबाधीत राखण्यासाठी व शिक्षक विरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी शिक्षक महासंघाने रणशिंग फुंकले आहे.शिक्षकांचा लढा अधिकाधिक तिव्र करण्यासाठी शिक्षक महासंघाच्या (महिला महासंघ) अमरावती शहराध्यक्षपदी सौ.मायाताई वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुडीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर शिक्षकांच्या हक्कांचा एल्गार पुकारण्यात आला आहे.या शुभदिनी त्यांना विजयाचे प्रतीक असलेली गुढी अमरावती महानगराचे अध्यक्ष श्री.अनिल पंजाबी यांच्या हस्तेभेट देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी शिक्षक महासंघाचे सर्व श्री मनोज कडू,अमरावती शहराध्यक्ष अनिल पंजाबी,राहुल मोहोड,शहर उपाध्यक्ष रेमंड मोजेस,धनराज पुनसे,मोहन पांडे,प्रा.नितीन टाले, सुभाष इंगळे,सुधीर सुरजुसे,प्रशांत दुधे,प्रविण कराळे,पवन राठी,राहुल माकोडे,निलेश सोळंके,संजय पाचंगे,प्रविण कराळे यासह शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मायाताई वाकोडे ह्या संत कंवरराम विद्यालय अमरावती येथे शिक्षक पदावर कार्यरत असुन शैक्षणीक क्षेत्राचा त्यांना अनुभव आहे.विवीध विद्यार्थीहिताय कार्यक्रमात व उपक्रमात त्या सक्रीय सहभागी होत असतात.शिक्षकांच्या मागण्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्या सदैव प्रयत्नरत असतात. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग शैक्षणीक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी व्हावा यासाठी ही निवड करण्यात आली आहे. शिक्षक महासंघाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये एकमताने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शासनाच्या शिक्षक हित विरोधी कारवायामुळे समाज घडविणा-या शिक्षक पदाचे अवमूल्यन होत आहे असा सुर समाजातुन निघत आहे.राष्ट्रनिर्मात्यावर भावीपिढीची जबाबदारी असुन सर्वांगसुंदर समाजाची निर्मीती करण्यासाठी शिक्षकांची सर्व समस्यातुन मुक्तता करणे हाच एकमेव पर्याय आहे. शैक्षणीक क्षेत्रातील गुंता कमी करुन संभ्रमाची अवस्था टाळण्यासाठी व शिक्षकबांधवांच्या व भगीनींच्या न्याय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शिक्षक विरोधी कारवाया विरोधात एकजुटीने लढा उभारण्याचे ठरले आहे. यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष मायाताई वाकोडे यांनी महिला शिक्षकांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा मनोदय व्यक्त केला.गुढी ही विजयाचे प्रतीक असुन शिक्षकांच्या हक्कांचा शिक्षक महासंघाच्या व्यासपीठावर नक्कीच विजय होईल अशा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षक महासंघ हे शिक्षकांचे व्यासपीठ असुन शिक्षक विरोधी धोरणे,अन्यायकारक शासननिर्णय आता खपवून घेतल्या जाणार नाही.शिक्षक हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी नवनियुक्त शहराध्यक्षांशी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत हितगुज करतांना स्पष्ट केले आहे.




http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2261

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.