BREAKING NEWS

Monday, April 25, 2016

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहचविणार -पालकमंत्री बावनकुळे · खापरीत सातवे समाधान शिबिर · गावात न जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई · गावातील जनतेला शासनाशी जोडणार · खापरीचे प्रश्न वर्षभरात सोडविण्याचा प्रयत्न · चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव



* नागपूर / भीमराव लोणारे /----* ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या समस्या सुटाव्या व शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचाव्या, हाच समाधान शिबिराचा उद्देश आहे. या उपक्रमात जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना घरी बसावे लागेल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज खापरी (मिहान पुर्नवसन) येथील शिबिरात दिला.




खापरीच्या आय टी आय इमारतीत हे शिबिर आज पार पडले. नागपूर ग्रामीण मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराला प्रतिसाद दिला. असे असले तरी अनेक नागरिकांच्या समस्या अजून सुटल्या नसल्यामुळे पुन्हा एकदा या भागात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरात जि.प अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिच कुर्वे, जि.प मुख्य कार्यपालन अधिकारी  शिवाजीराव जोंधळे, जि.प सदस्य  रुपराव शिंगणे, मिहानचे अधिकारी , ग्रामपंचायतचे सरपंच , सभापती नम्रता राऊत, रेखा मसराम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेसाठी हा अत्यंत महत्वाचा उपक्रम असून जनता-प्रशासन व सरकारच्या थेट जनतेशी संवाद या माध्यमातून घडून येत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा शिबिरांना जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. असे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले जि.प मतदार संघात असलेल्या, पटवारी, ग्रामसेवक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पुशुसंवर्धन अधिकारी यांनी बैठका घ्याव्यात  व त्या बैठकांमधून येणाऱ्या समस्या गावातच सोडवायच्या सोबत शासकीय योजनांची माहिती जनतेस सांगायची. शासनाच्या योजनांशी ग्रामीण भागातील जनतेला जोडण्याचे कार्य या

माध्यमातून करायचे. अत्यंत महत्वाच्या कार्यात कोणताही अधिकारी चालढकल करीत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यावर सरळ कारवाई करण्याचे जाहीर निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

मिहानमधील खापरी गावाच्या पुर्नवसनाचे प्रश्न प्राधान्याने वर्षभरात सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले जे प्रकरण न्यायालयात आहे. त्या प्रकरणात समझोता होऊ शकेल काय ? याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याचा हे शासन गौरव करेल पण कामचुकारपणा मात्र खपवून घेतला जाणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शहरालगत असलेल्या नागपूर ग्रामीण भागात व मिहानमध्ये मोठमोठे उद्योग आणले आहेत.एवढया मोठया प्रमाणात कधीही विकास कामे या भागात झालेली नाहीत. या शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय येत आहे, त्यापूर्वी एम्स हे मोठे हॉस्पीटल आय आय टी, आयआय एम असे उच्च शिक्षण देणाऱ्या  संस्था, राष्ट्रीय दर्जाची आरोग्य  सेवा देणारी हॉस्पीटल येथे सुरू होत आहेत. हे केवळ गरिबांची सेवा करण्याच्या व शहरासह नागपूर जिल्हयातील जनतेला सुविधा उपलब्ध होण्यासाठी केली जात आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे मुख्यालय गाव आहे, तर त्यांनी गावात राहिलेच पाहिजे, असे सांगताना पालकमंत्री म्हणाले यापूढे आपण अचानक आरोग्य केंद्र अंगणवाड्या, ग्रामपंचायती, शाळा तपासणार आहे. तहसिलदार व  पटवाऱ्यांनी गावात राहिले पाहिजे. ज्याचे घर गावात आहे, तेच गावात राहणार नाहित तर जनतेला सेवा कशी मिळेल. जिल्हाधिकारी, सीईओ, गावागावात जातात तर अधिकाऱ्यांना गावात का जावे वाटत नाही ? पर्यंटन  करण्याच्या उद्देशाने गावात जाऊ नका सामान्य माणसाला वा शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळू द्या सरपंचांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना गावात राहतात म्हणून खोटे प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहनही पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.

** श्री सचिन कुर्वे **

जिल्हाधिकारी सचिन सुर्वे यांनी यावेळी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा या उपक्रमात पुर्णताकदीने उतरा  व प्रशासन कसे काम करु शकते, प्रशासन गावात विकासाचे चांगले चित्र कसे निर्माण करु शकते याचा प्रत्यय आणून दाखवा. अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचणार आहेत.गरीब माणसाला, तळागाळातील माणसाला आपला उदासीनतेमुळे योजनांपासून वंचित राहण्याचे पाप आपल्या हातून घडू देऊ नका असे आवाहनही सचिन कुर्वे यांनी केले.

** शिवाजीराव जोंधळे **

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आपल्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे पाण्यचे महत्व ओळखून जलयुक्त  शिवार, शेततळे , जलसंधारणाची कामे अधिक व्हावीत यासाठी शासनाला सहकार्य करा, असे आवाहन जि.प.चे सीईओ शिवाजीराव जोंधळे यांनी केले. जिल्हयात 1500 गावामध्ये टंचाईच्या उपयोजना जिपने हाती घेतल्या आहेत. जुन्या नादुरुस्त बंधाऱ्याना दुरूस्त करण्यास प्राध्यान्य दिले आहे. शासनाच्या योजना आहेत, पण निधी नसता तर या योजनांचा उपयोग नसता. पण येथे योजनांसोबत निधीची कमी नाही वाट्टेल तेव्हढा  निधी आहे.अद्या जिल्हयात अधिकाऱ्यानी या योजनांचा फायदा जनतेला दिला पाहिजे, शासकीय निधीचा वापर करून कामे करा व जनतेपर्यंत त्याचे फायदे पोचवा ,असे आवाहनही जोंधळे यांनी केले. शासनाच्या 65 प्रकारच्या सेवा आहेत या सर्व सेवा ग्रामीणांपर्यंत पोहोचविण्याची आपली  जबाबदारी आहे, याची जाणीव  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी असेही ते म्हणाले.

या प्रसंगी जि.प अध्यक्षा निशा सावरकर, जि.प सदस्य रुपराव शिंगणे यांनीही आपले विचार व्यक्त केले. शासनाच्या विविध विभागाचे दालन येथे उपलब्ध होते. या दालनाच्या माध्यमातून शिबिरात आलेल्या जनतेला शासनाची माहिती देण्याचे काम दिवसभर सुरू होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.