◆ चांदूर रेल्वे / शहेजाद खान ◆/--- चांदूर रेल्वे तालुक्यात विहिरीमध्ये बसून एका अनोख्या उपोषणाला सोमवारपासून सुरवात झाली आहे. चांदूर रेल्वे नगरपरिषदेमध्ये घरकुल मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गौतम जवंजाळ यांनी विहिरीत बसून उपोषणाला सुरवात केली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी नवीन रूजु झालेले एसडीओ विधाते यांनी दोषींवर कोणतीही कारवाई न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वारंवार उपोषण सोडण्याची विनंती करीत असुन जवंजाळ यांनी हातात थेट एफआयआर प्रत द्या तरच विहिरीतुन बाहेर निघतो अशी भुमीका घेतली आहे. भ्रष्टाचाराचे थेट पुरावे दिल्यानंतरही जिल्हाधिकारी राजकीय दबावामुळेच कारवाई करीत नसल्याचा आरोप जवंजाळ यांनी केला असुन मंगळवारी शहरवासीयांनी प्रशासनाविरूध्द बैनर, पोस्टर लावुन निषेध केला आहे. चांदूर रेल्वे नगरपालिकेत तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार असतानाच घरकुल घोटाळा झाल्याचे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गौतम जवंजाळ यांनी माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी संबंधित अधिकारी नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनस्तरावर या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी किरण गिते यांच्याकडे सादर झाला असतानाही राजकीय दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचा आरोप गौतम जवंजाळ यांचा आहे. चांदूर रेल्वे न.प. अंतर्गत येत असलेल्या उर्दु शाळेजवळील एका काँग्रेसच्या नगरसेविकेचे पती यांनी त्यांच्या लेआऊटमधील सार्वजविक विहीर बुजवली होती. मात्र एकीकडे पाण्याचा दुष्काळ असताना विहीर बंद करण्याचा घाट गौतम जवंजाळ यांनी उखडून लावला होता आणि हीच ती विहीर आहे, त्याच विहिरीत गौतम जवंजाळ यांनी नगरपालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विहिरीत उपोषणाला बसले आहे. मंगळवारी अधिकारी दोषींवर कोणतीही कारवाई न करता जिल्हाधिकऱ्यांचा आदेशाने वारंवार उपोषण सोडण्यास जवंजाळांवर दबाव टाकत असुन 30 एप्रीलपर्यंत कारवाईचे आश्वासन दिले असता एफआयआर प्रत भेटल्याशिवाय बाहेर निघणार नसल्याचे जवंजाळ यांनी ठामपणे सांगितले. यानंतर एसडीओ विधाते यांनी मंगळवारीच नगरपरीषद ला पत्र देवुन तात्काळ या प्रकरणावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जवंजाळ यांच्या अनोख्या उपोषणाने अख्खे प्रशासनच हादरल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.. शहरवासीयांनी केला जिल्हाधिकारी, सिओंचा निषेध- दरम्यान गौतम जवंजाळ यांना मागिल उपोषणवेळी उपविभागिय अधिकारी यांनी दिलेले आश्वासन भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांच्या दबावामुळे पाळलेले दिसत नसल्यामुळे जवंजाळ यांना पुन्हा विहिरीत तरंगते आमरण उपोषण करावयास भाग पाडले म्हणुन प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांचा शहसवासीयांनी मंगळवारी बैनर लावुन, पोस्टर वाटुन जाहिर निषेध केला. जिल्हाधिकारी पुरस्कारात खुष तर मुख्याधिकारी मुंबईवारीत खुष ! जवंजाळ यांच्या आंदोलनाकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. सर्व बाबींचे सज्जड पुरावे दिल़्यानंतरही कारवाईस वेळ का ? असा तीव्र शब्दांत शहरवासीयांनी सवाल उपस्थीत केला आहे
Tuesday, April 26, 2016
जिल्हाधिकाऱ्यांचा राजकीय दबावामुळे कारवाईस उशीर - गौतम जवंजाळांचा आरोप. शहरवासीयांनी केला जिल्हाधिकारी, सीओंचा निषेध. जिल्हाधिकारी पुरस्कारात खुष तर सीओ मुंबईवारीत खुष !
Posted by vidarbha on 6:40:00 PM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment