मुंबई - भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही आणि प्रसिद्धीलोलूप तृप्ती देसाई हाजी अली सबके लिए नावाने आततायी आंदोलन करत हाजी अली दर्ग्यातील मजारला हात लावण्यासाठी आज २८ एप्रिल या दिवशी संध्याकाळी दर्ग्याबाहेर पोहोचल्या. या वेळी दर्ग्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जमलेल्या एम्आयएम्, मुस्लिम लीग आणि समाजवादी पक्ष यांच्या मुसलमान कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक आंदोलन करत आणि घोषणा देत तृप्ती देसाई यांच्या गाडीला घेराव घातला. या वेळी तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये; म्हणून त्यांना वरळीच्या मार्गाने अज्ञातस्थळी नेले. त्यामुळे पोलीस संरक्षणात दर्ग्यात जाणार, अशा वल्गना करणार्या तृप्ती देसाईंच्या आंदोलनाचा चांगलाच फज्जा उडाला.
एम्आयएम्, अवामी विकास पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लिग आणि समाजवादी पक्ष यांच्या महिला, तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात दर्ग्याबाहेर जमून तृप्ती देसाई यांना जोरदार विरोध केला. या वेळी हिंदु महिलाही त्यांच्यासमवेत होत्या. नरिमन पॉईंट ते हाजी अली दर्गा या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्ग्याच्या बाहेर शेकडो पोलिसांची फौज होती, तसेच बॅरिकेड्स लावले होते. साध्या वेशातील अनेक पोलीसही होते.

Post a Comment