विशेष प्रतिनिधी /-- शरीयतनुसार कब्रस्तान आणि हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश नाही. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना रोखायला हवे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस उत्तरदायी असतील. न्यायालय किंवा अन्य कुणीही कुराणच्या विरोधात गेल्यास ते ठीक होणार नाही. तृप्ती देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे तोंड काळे करू.
तृप्ती देसाई मुंबईचे वातावरण बिघडवत आहेत, असा आरोप एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील यांनी केला होता. आम्ही तृप्ती देसाईंना धक्के मारून बाहेर काढू, त्या प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहेत. हा आमचा धार्मिक प्रश्न आहे. मी माझ्या महिला विंगला सांगितले आहे की, तिला विरोध करा, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले होतेे. शिवसेनेचे आमदार हाजी अराफत यांनी यापूर्वीच तृप्ती देसाईंना चप्पल मारू, असे सांगून विरोध केला होता.

Post a Comment