अमरावती : /--
खरेदी केलेली शेतजमिनीचा ७/१२ नावावर करून देण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व ७/१२ नावावर करण्यात यावा, या न्यायासाठी ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसलेल्या वृद्घ शेतकरी व माजी निवृत्त अभियंता यांना ७/१२ सोपवित लिंबू पाणी पाजून आम आदमी पक्षाचे जिल्हा ग्रामीण चे श्री महेश देशमुख व प्रहर चे श्री छोटू महाराज वसू यांनी उपोषण सोडविले.
सुधाकर लोमटे (७३) यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी मसला शेतशिवारात गजानन घन रा. मांजरी यांच्याकडून शेत खरेदी केले. शेतीचा ७/१२ नावावर करण्याकरिता त्यांनी तलाठी इंदूरकर यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केले. मात्र पैसे न दिल्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जाणीवपूर्वक फेरफार न करता खोटा शेरा लिहून उपविभागीय अधिकारी यांची दिशाभूल केली. त्यामुळे लोमटे यांना नाहक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. ७/१२ नावावर करण्यात यावा व संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या मागणीला घेऊन ते गेल्या ४ दिवसांपासून जिल्हाधिकारी परिसरात उपोषणास बसले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने सुधा त्यांना वेळोवेळी मदत केली ज्यात चांदूर रेल्वे चे श्री नितीन भाऊ गवळी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचा सोबत ७/१२ संदर्भात चर्चा केली सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या कानावर घातले. उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ दखल घेत आज गुरुवारी लोमटे या शेतकर्याचा ७/१२ त्यांच्या सुपूर्द केला व लिंबू शरबत पाजून त्यांचे उपोषण सोडविले. यावेळी छोटू महाराज वसूसह , आम आदमी पक्षाचे श्री महेश देशमुख , बाजूला उपोषणाला उपस्थ्तीत मदन शेळके आदी उपस्थित होते

Post a Comment