BREAKING NEWS

Wednesday, May 4, 2016

2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सर्व विभागाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी- श्री डॉ.दिपक म्हैसेकर - 10 मे पर्यंत माहिती पाठविण्याचे निर्देश

प्रवीण गोंगले /चंद्रपूर - 

 
1 जुलै 2016 रोजी वनमहोत्सव अंतर्गत राज्यभर 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनातर्फे राबविण्यात येणार असून चंद्रपूर जिल्हयासाठी असलेल्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचे प्रत्येक विभागाने नियोजन करुन 10 मे 2016 पर्यंत माहिती पाठविण्याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरशे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हाधिकारी रमेश हरखंडे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे प्रमुख व संवर्ग विकास अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हयासाठी 6 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून वनविभाग व सामाजिक वनीकरणातर्फे या रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. 6 लाख उद्दिष्टापैकी 4 लाख 50 हजार वनविभाग, वनविकास महामंडळ व सामाजिक वनीकरण यांच्यातर्फे लावण्यात येणार असून 1 लाख 50 हजार रोपांची लागवड इतर विभागांना करावयाची आहे.  ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 20 टक्के अधिक वृक्ष लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
सर्व शासकीय कार्यालय, ग्राम पंचायत, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिवासी आश्रम शाळा, वस्तीगृह, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, वस्तीगृह, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कारखाने, पोलीस ठाणे, सहकारी संस्था, पाणलोट क्षेत्र, शेतीचे बांध, लघु तलाव, पाझर तलाव, बसस्थानक तसेच रस्त्‍याच्या दुर्तफा वृक्ष लागवड करावयाची आहे.  कुठल्या विभागाला किती उद्दिष्ट आहे याची माहिती 16 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.
वृक्ष लागवडसाठी खड्डे खोदणे तसेच वृक्ष लागवड याबाबतची तांत्रीक माहिती वनविभागातर्फे देण्यात येणार आहे. त्यासोबच कुठल्या विभागाला किती रोपाची आवश्यकता आहे याची नोंदणी प्रत्येक विभागाने नियोजन करुन 10 मे 2016 पर्यंत ccfchandrapur@gmail.com, dycollchandrapur@mgnarege.com, collector.chanda@gmail.comddsfdchandrapur@gmail.com या पत्यावर नोंदवावी असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.  तांत्रिक माहिती www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वृक्ष लागवड व संवर्धन यासंबंधीची सविस्तर माहिती प्रत्येक विभागाने छायाचित्रासह शासन निर्णयात नमूद केलेल्या जिपीएस प्रणालीवर अपलोड करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. लावलेल्या वृक्षाची 3 वर्षापर्यंत जपणूक करण्याची जबाबदारी संबंधीत विभाग व कार्यालयावर राहणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन 2 कोटी वृक्ष कार्यक्रम लागवड यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.