BREAKING NEWS

Wednesday, May 4, 2016

इरई नदी पुररूज्‍जीवन कार्यक्रमास चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्र देणार योगदान तातडीने 2 जेसीबी मशीन व 5 टिप्‍पर कायमस्‍वरूपी उपलब्‍ध होणार

प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---/

चंद्रपूर जिल्‍हयाची जीवनवाहीनी असलेल्‍या इरई नदीच्‍या पुनरूज्‍जीवनाच्‍या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्र आपले योगदान देणार असल्‍याचे महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक
श्री. विपीन श्रीमाळी यांनी स्‍पष्‍ट केले.

दिनांक 3 मे 2016 रोजी सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदीच्‍या पुनरूज्‍जीवन कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राने सहभाग व योगदान द्यावे अशी सुचना केली. इरई नदीच्या पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे गेल्या काही वर्षात इरई नदीची क्षती झाली आहे . त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने योगदान व सहभाग देणे गरजेचे आहे असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले . यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विपीन श्रीमाळी यांच्‍यासह अन्‍य अधिका-यांची उपस्थिती होती. इरई नदी पुनरूज्‍जीवन कार्यक्रमासाठी महानिर्मीती कंपनीतर्फे तातडीने 2 जेसीबी मशीन्‍स आणि 5 टिप्‍पर कायमस्‍वरूपी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल तसेच महानिर्मिती कंपनीच्या आर्थिक योगदानाचे स्वरुप सुद्धा लवकरच ठरविण्यात येईल असे श्री. विपीन श्रीमाळी यांनी स्‍पष्‍ट केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.