ठाणे /-----
सेना-भाजपने ठाणे पालिकेत केलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकर नाराज आहेत. नागरिकांची नाराजी ही काँग्रेस दूर करणार असून काँग्रेस ठाण्यात मजबूत करणार असल्याचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ठाण्याच्या टीप टोप हॉटेल्स मध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना गटबाजीला तिलांजली देत कार्याला धडाडीने सुरुवात करा असा सल्ला ही दिला. ठाण्यात कुठलीही गटबाजी चालणार नाही एकच गट सोनिया गट राहील असा सल्ला दिला. दरम्यान मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारयण राणे विधान परिषदेबाबत म्हणालेविधानपरिषद बाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तर संदीप सावंत मारहाण प्रकरणी मी खूप काही बोललो आहे, चौकशी अंतर्गत भाग आहे. काँग्रेस पक्षाने नारायण राणे याच्यावर ठाणे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविल्यानंतर प्रथमच पक्षाच्या कार्यकर्त्याची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी प्रथम ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेतला. पत्रकारांनी विचारलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत राणे म्हणाले की,विधानपरिषदेच्या होणा-या निवडणुकीच्या बाबतीत तसेच पालिका निवडणुकीच्या बाबतीत राणे यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांची मने जाणून घेतली. या वेळी कार्यकर्त्यांनी भिन्न मत व्यक्त केली आहेत तसेच कार्यकर्त्यांची मते पक्ष श्रेष्ठीना सांगणार असल्याच देखील राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भविष्यात होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याच सांगून मी चर्चेत असल्यामुळे मी लढायला कधीही तयार असतो असे देखील राणे यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Post a Comment