पुलगाव (वर्धा) - प्रदीप रामटेके /-- :
याबाबतची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आली असून देवळी येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे. शिवाय डेपो परिसरातील गावे सर्व गावे आता खाली करण्यात आले आहेत
डेपो परिसरालगतच्या झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले. हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदश्रीने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.
यामध्ये ले. कर्नल पवार, मेजर मनोज यांचा मृत्यू झाला आहे
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वरून या घटनेबद्दल शोक आणि चिंता व्यक्त करताना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पुलगाव येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते . तेव्हा पर्रीकर पुण्यात होते तेव्हा ते थोड्या वेळा पूर्वीच पुलगावमध्ये दाखल झाले . पर्रीकर यांनी लष्कराकडे या दुर्घटनेचा अहवाल मागितला आहे.
आग आटोक्यात आणण्यात आता यश आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ANI शी बोलताना दिली. परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला आवश्यकत्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी वेगाने मदतकार्य सुरू आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले

Post a Comment