चंद्रपूर - / प्रवीण गोंगले /--
मुल शहरातील स्ट्रीट लाईटबाबत बैठक
चंद्रपूर - मूल रस्त्यावरील मूल शहरातील पथ दिवे तसेच विद्युत
वाहिन्या स्थानांतरित करण्यासाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव 24 मे च्या आत
मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी
कार्यालयात आज मुल शहरातील स्ट्रीट लाईटबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती
त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ.
दिपक म्हैसेकर, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय दैने, विद्युत
विभागाचे अधिक्षक अभियंता हरीश गजबे, सभापती देवराव भोंगळे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, विजय खांबाळकर, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूर मूल
रस्त्यावरील मूल शहरातील तहसील कार्यालय ते बाजार रोड पर्यंतच्या रस्त्यावरील
लावण्यात आलेले पथदिवे सात दिवसात सुरु
करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. चंद्रपूर मूल रस्त्यावरील मूल शहरातील
रेल्वे लाईन ते तहसील कार्यालय व बाजार चौक ते राईस मिल, मूल शहरातील 10 कोटी निधी अंतर्गत करण्यात आलेल्या मूल -सोमनाथ -गांधी चौक ते विश्रामगृह
ताडाळा रस्ता, तालुका उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता व मूल शहरातील 15 कोटी निधी अंतर्गत सुरु असलेल्या क्रॉंक्रीट रस्त्यावरील विद्युत वाहिन्या
स्थानांतरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला 24 तारखेच्या आत
मंजुरी देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पथ दिव्याचे काम
करणाऱ्या कंत्राटदाराने 42 टक्के कमी
दराने निविदा सादर करून काम घेतले आहे. या कामाचे अंदाजपत्रक, कामाचा दर्जा इत्यादींची चौकशी 15 दिवसात करून
अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुलचे सर्व रस्ते तात्काळ पूर्ण करण्यात
यावेत असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment