BREAKING NEWS

Saturday, May 7, 2016

आदिवासी विकास राज्यमंत्री मा.ना.श्री.अंबरीश महाराज आत्राम यांच्या हस्ते जलपूजन करून चूडामणी नदी स्वच्छता अभियानाला सुरवात.

रंगय्या रेपाकवार / विशेष प्रतिनिधी /---

वरुड शहराची जीवनदायिनी असलेली चुडामणी नदीच्या स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज आदिवासी विकास राज्यमंत्री मा.ना.श्री.अंबरीश राजे आत्राम साहेब यांच्या हस्ते जलपूजन करून स्वच्छता अभियानाला ख-या अर्थाने सुरवात करण्यात आली. वरुडच्या जीवनदायीनीला पूर्वीचे पवित्र स्थान प्राप्त करून देण्यासाठी आज चूडामणी नदीपात्रात लोकसहभागातून स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी लोकसहभागासाठी  लोकसभा घेण्यात आली. या लोकसभेला आदिवासी विकास राज्यमंत्री मा.ना.श्री.अंबरीश राजे आत्राम साहेब, मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिलजी बोंडे, खासदार रामदासजी तडस, माजी आमदार नरेशचंद्रजी ठाकरे, वरुड शहराचे नगराध्यक्ष रवींद्रभाऊ थोरात, माजी महिला व बाल कल्याण सभापती सौ.अर्चनाताई मुरुमकर, भाजपा ग्रामीण महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई तुमडाम आदी मान्यवरा सह, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.