BREAKING NEWS

Wednesday, May 11, 2016

शिरूर (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण - संत आणि जनता यांचे रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते असणारे राष्ट्रच हवे

 शिरूर,/- 



-परमपूज्य  राष्ट्रसंत  भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. यामध्ये त्यांनी वाहनचालकाला मारहाण केली. त्यानंतरही चौंडी घाटामध्येही काही अज्ञात हत्यार घेऊन आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते या सर्व प्रसंगांतूनही प.पू. भय्यूजी महाराज हे सुखरूप असल्याची माहिती सूर्योदय आश्रमाचे श्री. तुषार पाटील यांनी दिली.श्री. तुषार पाटील यांनी सांगितले, "प.पू. भय्यूजी महाराज हे त्यांच्या अनुयायांसमवेत पुण्याहून इंदूरकडे जात होते. त्या वेळी रांजणगाव परिवहन बसस्थानकाजवळ त्यांच्या गाडीला एका ट्रकची धडक बसली. या वेळी वाहनाची किती हानी झाली, हे पहाण्यासाठी आम्ही थांबलो असता काही अज्ञात तरुणांनी चालकासमवेत वाद घालत मारहाण केली आणि शिवीगाळही केली. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पुढील प्रवास चालू केला. त्यानंतर मनमाड येथील चौंडी घाटातही काही व्यक्ती रस्त्यावर हत्यार घेऊन उभे होते. त्या ठिकाणीही आपल्यावर आक्रमण होणार आहे, हे लक्षात आल्यावर वाहन रस्त्याच्या कडेने जोरात नेऊन पळ काढण्यात आला."

.पू. भय्यूजी महाराज यांनी समाजातील काही घटकांवर धार्मिक बाजार मांडून करोडो रुपये व्यय केले जातात. सामाजिक कामासाठी लक्ष देण्यात येत नाही, अशी टीका केली होती. या टीकेमुळेच त्यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचा दावा श्री. तुषार पाटील यांनी केला आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.