उज्जैन /--- -
उज्जैन सिंहस्थपर्वातील पहिल्या अमृत (शाही) स्नानानंतर चालू झालेल्या पावासाने ९ मे या दिवशी दुसर्या अमृत स्नानाच्या वेळी रौद्ररूप दाखवले. वादळी वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे १ सहस्र ५०० मांडवांना मोठा फटका बसला आहे. यात ३०० मंडपांच्या कमानी आणि २०० हून अधिक मांडव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. मंडपात अडकल्यामुळे शेकडो लोक घायाळ झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन न पोहोचल्यामुळे लोकांना शासनाकडून कोणतीही सुविधा दुसर्या दिवसापर्यंत मिळालेली नव्हती. स्थानिक लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना साहाय्य केले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून वाहनांवर पडल्यामुळे ६ वाहने पूर्णपणे चेपली गेली होती. अनेक मंडपामध्ये पाणी गेल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली.
अनेक धार्मिक कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत; मात्र एकाही यज्ञशाळेला हानी पोहोचलेली नाही. मोठमोठे मंडप, कमानी पडत असतांना गवत आणि बांबू यांपासून बांधलेल्या यज्ञ-याग शाळा जशाच्या तशा आहेत.
१. सिंहस्थात पडणार्या पावसाविषयी हवामान खात्याने म्हटले आहे की, सिंहस्थ संपेपर्यंत पावसाचे थांबणे अशक्य आहे. २१ मेपर्यंत सलग पावासाची शक्यता आहे. येणार्या ३-४ दिवसांत उज्जैनमध्ये वादळासह पावसाची शक्यता आहे. २१ मेपर्यंत दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत धोकादायक वेळ आहे.या वेळेत लोकांनी तात्पुरत्या मांडवात न रहाता सुरक्षित ठिकाणी थांबावे. प्रशासनानेही नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या आहेत

Post a Comment