प्रवीण गोंगले /- चंद्रपूर /--
राहत्या घरात अवैधरित्या गांजा बाळगणार्या व विक्री करणार्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीशानी 9 मे रोजी सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे .विलास रामचंद्र किनेकर असं आरोपीचं नाव असुन 2013 मध्ये रामनगर पोलिसांनी त्याला याप्रकरणी अटक केली होती. .
रय्यतवारी काॅलरी निवासी विलास किनेकर यांच्या घरात अवैधरित्या गांजा ठेउन विक्री करीत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. .या माहितीच्या आधारे पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्या घरातील किचनमध्ये गुणगीकारक मादक वनस्पतीची पाने, फुलं, देठे व बिज, असा एकुण 18 हजार 100 रुपयांचा 3 किलो ग्रॅम गांजा आढळुन आला .
त्यानुसार पोलिसानी त्याला अटक करुन त्याच्या विरोधात एन डि पी एस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला आणि त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले .दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्यास यानी 9 मे रोजी याप्रकरणी साक्षीदार तपासुन प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे गुन्हा सिध्द करत, विलास किनेकर या आरोपीला 5 वर्ष सक्त मजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. .दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त सक्त मजुरीची शिक्षाही न्यायालयानं सुनावली .याप्रकरणी अॅड. जयंत साळवे यानी सरकारतर्फे बाजु मांडली .
Post a Comment