BREAKING NEWS

Thursday, May 5, 2016

कर्जत सब जेलची दुरावस्था ! पोलिस निरीक्षक लक्ष देतील का?

कर्जत/ अनिल चौधरी  /---

कर्जत हे शहर मध्यवर्ती ठिकाणी असुन कर्जत पोलीस ठाण्याच्या  अंतर्गत सबजेल हे तहसील टेकडीवर असल्यामुळे या सबजेलला अनेक वर्षे पुर्ण होऊन देखील या जेलची पूर्णतः दुरावस्था झाली आहे.परतु याकडे पोलीस निरीक्षक भोसले यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या तरी हे सबजेल विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेले आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की कर्जत तहसील कार्यालय शेजारी  कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत सबजेल असुन सुद्धा तब्बल 116 वर्षे पूर्ण झाली असून या जेलची कौले ही फुटलेल्या अवस्थेत असून तेथे आरोपींना प्रवेश करण्याकरता दोन दरवाजे असुन त्या दरवाज्यांना किमान चार फुटापर्यंत पत्रे मारल्यामुळे उन्हाळ्यात व पावसाळ्यात विषारी सरपटणारे प्राणी जेलमध्ये मुक्तपणे प्रवेश करतात.त्यामुळे  पोलीस कर्मचारी व आरोपी याच्या जीवितास धोका निर्माण होऊन एखादी दुर्घटना घडली  तर त्यास जबाबदार कोण??  असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत सबजेलला  एकूण चार लाॅकअप असुन या लाॅकअप रूममध्ये शौचालयांची भांडी फुटलेली असुन सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्यामुळे त्यांचा त्रास आरोपी व तेथे ड्युटी करणारे  पोलीस कर्मचारी यांना होत आहे. एकंदरीत या शौचालयात पाणी टाकले असता ते चोकअप होऊन ते पुन्हा जमिनीवर येत आहे. परिणामी आरोपींना ओलसर जागेवर झोपावे लागते. तसेच महिला व पुरुष आरोपीकरिता  स्वतंत्र  बाथरूमची सोय  नसल्यामुळे महिला  आरोपींना  नेहमीच त्रास सहन करावा लागतो.सदर सबजेलला पोलीस निरीक्षक  रमेश भोसले हे वेळोवेळी भेट देतात.मात्र या समस्यांकडे ते जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत अशी चर्चा पोलीस कर्मचार्यामधे होत आहे.
  
 सदर सबजेलला बसवलेल्या लोखंडी जाळ्या मोकळ्या असुन हा परिसर झाडाझुडपांनी वेढलेला असुन डास, विंचू, साप या विषारी प्राण्याचा मुक्त वावर असतो . त्यामुळे तेथे डय़ुटीवर असणारे पोलीस व आरोपी यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपुर्वी  एका पोलीस कर्मचार्याची तेथे ड्युटीवर असताना मलेरिया आजाराने ग्रासले  त्यानंतर त्याला तत्काळ मेडिकल रजेवर जावे लागले.तरी सबजेलला मच्छर बंद जाळ्या त्वरीत बसवणे गरजेचे आहे.तसेच कर्जत पोलीस ठाण्यात लहु मोरे म्हणून अंशकालीन सफाई कामगार असुन त्याची नियुक्ती करण्यात झाल्यापासून  आजपर्यंत पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक यांच्या बंगल्याची सफाई करणे ही कामे करीत असतो पण सबजेल लाॅकअप मध्ये कधीच साफसफाई करीत नाही याचा त्रास  तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना होत आहे व त्याना स्वत: हुन लाॅकअप ची  साफसफाई करावी लागते. योग्य रितीने लाॅकअप ची साफसफाई झाली तर येथे ड्युटी करणारे पोलीस कर्मचारी व जेलमधील आरोपी याचे आरोग्य चांगले व निरोगी  राहिल अशी  प्रतिकीरया एका पोलिसाने व्यक्त केली तसेच या सबजेलमध्ये पाण्याची  टंचाई भासत आहे या सर्व समस्यां कडे  या महिन्यात निवृत्त होत असलेले पोलीस निरीक्षक जाता जाता लक्ष देतील का? अशी चर्चा पोलीस वर्तुळात बोलले जात आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.