प्रवीण गोंगले / चंद्रपूर -
चांदा ते बांदा असा रिसोर्स बेस्ड विकास आराखडा कार्यक्रमाअंतर्गत पोंभूर्णा क्षेत्रात राईस क्लस्टर विकसीत करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पोंभूर्णा येथे पोंभूर्णा तालुका विकास आराखडा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
* पोंभूर्णा तालुका विकास आराखडा * रोजगार निर्मितीवर
भर
चांदा ते बांदा असा रिसोर्स बेस्ड विकास आराखडा कार्यक्रमाअंतर्गत पोंभूर्णा क्षेत्रात राईस क्लस्टर विकसीत करुन रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पोंभूर्णा येथे पोंभूर्णा तालुका विकास आराखडा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह
चंदेल, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, प्रभारी
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, सभापती देवराव भोंगळे, पोंभूर्णा येथील
सभापती बाबूजी चिचोंलकर, नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार व भाजपा अध्यक्ष हरीष शर्मा तसेच विविध विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
पोंभूर्णा
तालुका विकास आराखडा सर्वंकष व विकासाभिमुख तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
कृषी, सिंचन, रोजगार, रस्ते, शिक्षणाला या आराखडयात प्राधान्य देण्याचे निर्देश
त्यांनी दिले. हा भाग धानाचा असल्यामुळे
राईस क्लस्टर निर्माण करुन मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येईल असे ते
म्हणाले. येत्या तीन वर्षात या भागात बंधारे
बांधून सर्व माजी माजगुजारी तलावाची दुरुस्ती करण्यात येईल.
चंद्रपूर
जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून पोंभूर्णा तालुका व क्षेत्रात
मोठया प्रमाणात धान घेतले जाते.
पोंभूर्णा, मूल, बल्लारपूर व कोठारी या भागातील शेतक-यांसाठी पोंभूर्णा
येथे धान व लाख विक्रीची व्यवस्था करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शासन राज्यात 5 हजार विहीरी बांधण्याचा
कार्यक्रम राबवित असून आपल्या जिल्हयात ऑक्टोंबर मध्ये ही योजना सुरु करण्यात
येणार आहे. याचा लाभ पोंभूर्णा येथील अनेक
शेतक-यांना देण्यात येईल. कर्नाटक येथील अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने या
विहीरी खोदण्यात येतील.
टाटा
ट्रस्टच्या वतीने पोंभूर्णा तालुक्यातील कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून यावेळी सर्वेक्षण
अहवालाचे टाटा ट्रस्टच्या वतीने सादरीकरण करण्यात आले.
दिघोरी-फुटाना
खडीकरण रस्ता डांबरीकरण करणे व वेळवा-चेकफुटाना रस्त्याची दुरुस्ती करण्याचे
नियोजन करावे अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. पोंभूर्णा येथील
बसस्थानक आधुनिक करण्यासाठी जागा पहाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम जलद गतीने
करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.
दुग्ध
उत्पादन व कुक्कुट पालन हे रोजगार देणारे व्यवसाय असून पोंभूर्णा तालुक्यात दुग्ध
व्यवसाय सुरु करण्यावर भर देण्यात येईल. त्याचप्रमाणे नोव्हेंबर मध्ये कुक्कुट
पालन प्रशिक्षण घेऊन महिलांना कुक्कुट शेड तयार करुन देण्यात येईल. या ठिकाणी 2
कोटी 70 लाख रुपये खर्च करुन ईकोपार्क उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे वनविभागातर्फे
3 कोटी 70 लाख रुपये खर्चाचे आधुनिक वनविश्राम गृह तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्व शाळांची संरक्षण भिंत, स्वच्छता गृह,
खेळाचे मैदान व नुतनीकरण इत्यादीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सोबतच सर्व शाळांमध्ये ई-लर्निग सुविधा उपलब्ध करुन दयावी असे त्यांनी सांगितले.
लवकरच पेरणीचा मोसम सुरु होणार असून कृषी विभागाने बि-बियाणे व खते मुबलक प्रमाणात
उपलब्ध करुन दयावीत. या परिसरातील विज वारंवार खंडीत होणार नाही याची दक्षता विज
विभागाने घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment