प्रवीण गोंगले /चंद्रपूर -
पोंभूर्णा नगर पंचायतच्या मोबाईल ॲपचे व संकेतस्थळाचे लोकार्पण पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. मोबाईल ॲप बनविणारी पोंभूर्णा ही राज्यातील पहिली नगर पंचायत ठरली आहे.
नगर
पंचायत कार्यालय पोंभूर्णा येथे नागरी सेवा केंद्र तसेच मोबाईल ॲप व संकेतस्थळ
याचे आरटीएस अंतर्गत 13 मॉड्युल लाईव्ह करण्यात आले. नगर पंचायतच्या सुविधा तसेच सोई व नागरिकांना
येणा-या अडचणीसाठी संकेतस्थळ व मोबाईल ॲप नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पालकमंत्री
ना.सुधीर मुनगंटीवार व नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार यांनी मुख्याधिकारी
विपीन मुद्दा यांच्या या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
या
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महाराष्ट्र वनविकास
महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस
अधिक्षक संदीप दिवाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपविभागीय
अधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार गाडे,
सभापती देवराव भोंगळे, भाजपा
अध्यक्ष हरीश शर्मा, नगर सेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.www.pombhurnaps.mahapanchayat.gov.in
Post a Comment