अहेरी / रंगय्या रेपाकवार /----
अहेरी परिसरात कालच्या वादळी पावसाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या पाणी पुरवठा व शुद्धीकरण केंद्राचा वीज खंडित झाल्याने अहेरीकरांवर शुद्ध पाणीचे संकट ओढवले आहे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फतच अहेरी नगरीत शुद्ध पाणी पुरवठा केला जातो ज्यामुळे अहेरीतील एकंदरीत 1900 कनेक्शन मधून जवळपास 14 हजार लोक ह्याच पाणीच्या भरवश्यावर असतात प्राणहिता सारखी बारमाही नदी असल्याने नळाच्या पाण्याचा पुरवठा परिवारासाठी पुरेसा असतो आणि सतत दोन ते तीन दिवसापासून विजेच्या लपंडावने अहेरीकराना पाणी नियमित मिळत नाही आहे त्यासोबतच दोन दिवसाची वीज खण्डिताने पाणी पुरवठा बंद असणार आहे म्हणून अहेरीकरांवर पाण्याची संक्रात आली आहे
ह्याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने अहेरीभर ऑटो फिरवून दोन दिवस पाणी बंद असण्याची दवंडी मारली आहे
ह्या विषयी माहिती घेण्यासाठी अहेरी नगरपंचयत चे पाणी पुरवठा सभापती स्मिता येमुलवार ह्यांनी मजीप्रा च्या कार्यालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली व वीज महामंडळ सोबत भ्रमणध्वनी शी सम्पर्क करून समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली तसेच सोबतच मजीप्रा ने पाणी पुरवठा बाबत नेहमी सतर्क राहण्याचे सांगितले ह्यावेळी नगरसेवक श्रीनिवास चटारे, शंकर मगडीवार, बाबुराव संतोषवार, संतोष येमुलवार, श्रीनिवास मगडीवार, दिनेश येनंगटीवार उपस्थित होते
Post a Comment