उज्जैन (मध्यप्रदेश) -

येथील विचार महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उपस्थित संत-महंतांना उपदेश करून निघून गेले. पूर्वी आपल्याकडे परंपरा होती की, राजे-महाराजे हे ऋषीमुनी यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्याचे आशीर्वाद घेत. ज्ञान घेत. आज मात्र राजा ज्ञान घेण्यासाठी नव्हे, तर उपदेश देण्यासाठी आला होता. हा विचार महाकुंभ नसून राजकीय मंथन आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांनी केली. ते पुढे म्हणाले की,
विचार महाकुंभाविषयी आम्हाला कोणती अडचण नाही; मात्र येथे राजकीय मंथन होत आहे. हे काम संसदेतही होऊ शकते. पंतप्रधान इंग्लंड येथे गेल्यावर भारत हा गौतम बुद्ध आणि गांधी यांचा देश असल्याचे सांगतात. त्यांनी हा देश राम-कृष्ण आणि शंकराचार्य यांचा आहे, असे का सांगितले नाही ? सनातन धर्माला अंतरबाह्य नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. अशा स्थितीत आपण धर्माचे रक्षण कसे करू शकतो, यावर चर्चा व्हायला हवी. विचार महाकुंभमध्ये अध्यात्मावर चर्चा झाली पाहिजे. धर्माचे रक्षण करण्यात येणार्या अडचणी दूर करण्यासाठी विचार व्हायला हवा.

शाळांमध्ये श्रीरामाचे चित्र का लावले जात नाही ?
- शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी
आज आपल्या देशात महंमद अफजलला हुतात्मा म्हटले जात आहे. यात आपल्या
शिक्षणप्रणालीची चूक आहे. आज मुलांना रामायण, महाभारत, गीता यांची शिकवण
दिली जात नाही. दुसरीकडे मदरशांमध्ये मात्र कुराणद्वारे इस्लाम शिकवला जात
आहे, तर ख्रिस्ती शाळांमध्ये बायबलद्वारे ख्रिस्ती धर्म शिकवला जात आहे.
त्या शाळांमध्ये येशू आणि मेरी यांची चित्रे लावलेली असतात, तर आपल्या
शाळांत श्रीरामाचे चित्र का लावले जाऊ शकत नाही ?
Post a Comment