BREAKING NEWS

Tuesday, May 17, 2016

बंगालमधील धर्मांधांनी हनुमान मंदिर पाडून श्री हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला फेकली !

 मयुरेश्‍वर (बीरभूम, बंगाल) -




बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्‍वरजवळ असलेल्या रामनगर गावातील धर्मांधांनी तेथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुर रब याच्या साहाय्याने हनुमान मंदिर उद्ध्वस्त करून श्री हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला फेकल्याचा संतापजनक प्रकार १२ मे या दिवशी घडला. त्यांना पंचायत समितीचे अध्यक्ष शमसुल आलम मल्लिक यांचीही साथ लाभली. या घटनेची माहिती राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली नाही. या मंदिरातील श्री बजरंगबलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अक्षय्य तृतीयेच्या म्हणजे ९ मे या दिवशी संत-महंतांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.पंचायत समितीचे अध्यक्ष शमसुल आलम मल्लिक यांच्या डोळ्यांत हे मंदिर खुपत होते. त्यांनी स्थानिक धर्मांध बसचालकांना हाताशी धरून त्यांना या मंदिरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करण्यास सांगितले. याशिवाय मयुरेश्‍वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुर रब यांच्या साहाय्याने मंदिर हटवण्याचा कट रचला. याची माहिती हिंदूंना मिळताच त्यांनी धर्मांधांना विरोध केला.
     या वेळी अब्दुर रब याने हिंदूंना तुम्हाला जवळच नवीन मंदिर एक आठवड्याच्या आत बांधून देतो, असे आश्‍वासन देऊन मंदिर पाडले आणि श्री हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला टाकून दिली. त्यानंतरच्या शुक्रवारी येथील मशिदीमध्ये नमाज झाल्यावर अब्दुर रब याच्यावर मुल्ला-मौलावींनी दबाव आणल्याने त्याने स्वत:चा शब्द फिरवत मंदिर बांधून देण्यास असमर्थता दर्शवली, तसेच असे आश्‍वासन दिल्याचेच नाकारले.बीरभूमचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि मयुरेश्‍वरचे प्रभारी पोलीस अधिकारी मयुरेश्‍वर येथे आले. त्यांनी हिंदु कार्यकर्त्यांनी बस स्थानकाजवळ केलेले रस्ता बंद आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावर हिंदूंनी मंदिर पुनर्बांधणीची मागणी केली. त्यावर जिल्हा पोलीस अधिकार्‍यांनी दोन आठवड्यांत मंदिर बांधून देण्याची मागणी मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.