अमरावती- (शहेजाद खान)-/
राज्यातील शेतकऱ्यांना तीन- चार वर्षापासुन सततच्या नापिकीला सामोरे जावे लागत आहे. अशी परीस्थीती असतांना जिल्हातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हान येथील एका शेतकऱ्याचा करंट लागुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज शनिवारी घडली. प्राप्तमाहितीनुसार, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण येथील शेतकरी सुरेश पांडुरंग उर्कुटकर (वय-60) आज 14 मे रोजी सकाळी 9 वाजता आपल्या शेतात गेले होते. दुपारी त्यांच्या शेताजवळून जात असलेल्या एका गुराख्याला शेतात त्यांचा मृतदेह दिसला. तळेगाव दशासर पोलिसांना घटनेची माहिती सरपंच नितिन कोंडेकर यांनी दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे. सुरेश उर्कुटकर यांच्या अचानक मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे..
Post a Comment