प्रवीण गोंगले / चंद्रपूर /--
एकीकडे राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले असतांना आता वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. चंद्रपूर शहराची वाटचाल देशातील सर्वात उष्ण शहराकडे होत आहे. आधीच पाणीटंचाई व त्यात तापमानाचा तडाखा यामुळे नागरिक धास्तावले आहेत.
सर्वाधिक प्रदूषित शहर चंद्रपूर आता सर्वाधिक उष्ण शहर असा बदलौकिक प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणीय बदलांमुळे तापमान वाढ उच्चांक गाठत असतांना हे रोखण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. याचा थेट परिणाम चंद्रपूरचा उन्हाळा कडक अधिक कडक होण्यात झाला आहे. चंद्रपूरचे आजचे तापमान देशात सर्वाधिक ४६ अंश नोंदले गेले असून गेले असून आज शहरातील रस्ते दुपारी निर्मनुष्य झाले होते. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालाने झाकण्याची काळजी घेत आहेत. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिनीच बदलून गेली आहे. उन्ह तापायच्या आत आवश्यक ती कामे करून घर गाठत कुलर -एसी मध्ये दाह कमी करणे हा दिलासा शोधला जातोय. याआधी मागील वर्षी १९ मे रोजी हे तापमान ४७.६ वर नोंदले गेले होते.
पर्यावरणाला बाधा पोचविणा-या व ऋतूचक्रात अडसर आणणा-या प्रत्येक गोष्टी या जिल्ह्यात बिनदिक्कतपणे केल्या जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे अगदी देशातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांच्या तुलनेत चंद्रपूर दुर्दैवाने आता आघाडीवर पोचले आहे.

Post a Comment