उज्जैन -
समरसता स्नानाच्या माध्यमातून भाजप राजकारण करत आहे. दलितांना क्षिप्रा नदीत स्नान करण्यापासून कोणीच थांबवले नाही, ते पाहिजे त्या वेळी स्नान करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा दिवस निर्धारित करण्याची काहीच आवश्यकता नाही. नद्या कधीच कोणाच्या जाती विचारत नाहीत, असे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले. येथील सिंहस्थपर्वामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पंडित दीनदयाळ विचार प्रकाशन या संस्थेने ११ मे या दिवशी दलित आणि आदिवासी लोकांसाठी वेगळे समरसता स्नान आणि शबरी स्नान यांचे आयोजन केले आहे. त्यासाठी वेगळ्या स्नानाची सोय करण्यात येणार आहे. यावर काँग्रेस, तसेच द्वारका आणि शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आक्षेप घेतला असून वादंग निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने ते बोलत होते.

Post a Comment