रंगय्या रेपाकवार / मूलचेरा /-//-
मुलचेरा तालुक्यातील लगाम पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत येणाऱ्या मौजा कांचनपुर येथे श्री. सुजित सुभाष राय यांच्या गाईने चक्क दोन डोके,सहा पाय असलेल्या वासरांना जन्म दिला. परंतू काहीवेळाने जन्मजात वासरांचा मृत्यू झाला आहे . माञ डा. श्री नाटके व श्री दिनेश कुसनाके यांच्या प्रयत्नाने गाय सुखरूप आहे. यावेळी त्याठिकाणी गावातील सौ. शंकरी बाईन पोलिस पाटील, श्री. ए. पी. दुधबळे, श्री. एम. एस. पंबालवार, श्री. प्रसंजित मनोरंजन राय, श्री. निखिल बाला, श्री. सुभाष सरकार, श्री. चित्तरंजन राय उपस्थित होते. तथा पाहण्यासाठी गावातील प्रचंड लोकांची गदी होती.
Post a Comment