सध्याच्या काळात व्यापारी देवतांचे चित्र व्यावसायिक कारणासाठी वापरतात, याला विरोध केलाच पाहिजे. लोकांमध्ये जनजागृतीचे हे स्तुत्य कार्य सनातन करत आहे. सनातनचे कार्य हे सत्यावर आधारित असल्याने ते वाढतच जाणार आहे. पूर्वी शासनाने सनातनवर बंदी आणण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे शासनाचा सर्वांत मोठा मूर्खपणा होता. स्वामी विवेकानंदानी केलेले कार्यच सनातन करत आहे, असे ओजस्वी विचार बेलपहाडी, कोलकाता येथील रामकृष्ण मिशनचे पू. स्वपन महाराज यांनी केले. ३ मे या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु प.पू. डॉ. जयंत आठवलेजी यांचे
छायाचित्र दाखवल्यावर त्यांनी छायाचित्राला नमस्कार केला. या वेळेस हिंदु
जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली,
तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
यांच्या हस्ते ध्वनीचित्रचकती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले.
Post a Comment