उज्जैन -
सिंहस्थ क्षेत्री असलेल्या विद् साधना साध्यम
ट्रस्टच्या पू. स्वामी चिदंबरानंदजी महाराज यांच्या व्यासपिठावर नुकतेच
राष्ट्र आणि धर्म संकटात : आपण गप्प का ? या विषयावरील संत संमेलनाचे आयोजन
करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय संत समितीकडून या संत संमेलनाचे आयोजन
करण्यात आले होते. या संमेलनात स्वामी भावेशानंद महाराज, हिमालयातील पू.
स्वामी हेमचंद्रजी, यथार्थ गीताचे प.पू. स्वामी राजेश्वरानंदजी, रतलाम
येथील भाजप नेते आणि हरिहर समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. राजेश शर्मा,
उज्जैन येथील पं. नारायण प्रसाद शर्मा, सर्वदलीय गौरक्षक दलाचे राष्ट्रीय
संयोजक श्री. महेंद्र कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय गौरक्षा मंचचे नरेंद्रजी
सनातनी, हरियाणा भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. पूनम बोहरा, स्वदेशी रक्षा
मंचच्या साध्वी शारदा आणि श्री. जितेंद्र आर्य, प्रसिद्ध समाजसेवी श्री.
पगनसिंह कुलस्ते आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ.
चारुदत्त पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment