नागपूर / भीमराव लोणारे /--
शिक्षणामुळे आपण समृद्ध होतो. भविष्यातील संधीचा
वेध घेतांना आपल्यामध्ये असलेली असुरक्षितेची भावना दूर करुन कौशल्य आधारीत क्षमता
निर्माण करुन आत्मविश्वासाने जिवनाची वाटचाल सुरु करा. यशाचे शिखर आपण निश्चितच
गाठू शकाल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणाच्या संधी आणि
व्यवसायाची निवड या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिसंवादात मार्गदर्शन करताना
युवकांना दिला.
हॉटेल
तुली इम्पेरीयल येथे नवराष्ट्र व नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे “एज्युकेशन एव्ह्यूनू
-2016” या
परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. “सर्वसमावेशक करिअर व्यवस्थापन” या विषयावर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधून मार्गदर्शन केले.
यावेळी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुप्रसिद्ध सिनेअभिनता विवेक ओबेरॉय, सायना एनसी,
अमीरबान सरकार, के.के.गोयल, कृष्ण कुमार, कृष्णा हेगडे तसेच नवभारत वृत्तपत्र
समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निमीष माहेश्वरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
करिअर
करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त क्षमता निर्माण करण्याचे आवाहन करुन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न असला
तरी उद्योजकांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळत नाही. उद्योग विकासासाठी आवश्यक
असणारे मनुष्यबळ निर्माण करताना कौशल्य विकास करण्याला प्राधान्य देत असल्याचेही
त्यांनी सांगितले.
जिवनात
योग्य मार्गदर्शन व संधी मिळाली तर कोणतीही व्यक्ती अयशस्वी राहणार नसल्याचे सांगून
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वसमावेशक संधीच्या शोधात असताना व प्रत्यक्ष आणि
अप्रत्यक्ष व्यवस्थापन कौशल्य निर्माण करताना कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील
संधीचा शोध घेणे आवश्यक आहे. व्यवसायाची निवड करताना अधिकच्या क्षमतेचा वापर कसा
करता येईल आणि यामुळे व्यवसाय वृद्धी कशी होईल, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन
केले.
नागपूर
येथे मेट्रो रेल्वे सुरु होत असतानाच तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकताही मोठ्या
प्रमाणात भासणार असल्यामुळे त्यादृष्टीने क्षमता निर्माण करणे आवश्यक असल्याचे
सांगताना ते पुढे म्हणाले की, विकसनशील देशापैकी भारत हा जगातील तिसरी मोठी
अर्थव्यवस्था असणारा देश राहणार आहे. जगात जेव्हा मानव संसाधनाची आवश्यकता भासेल
त्यावेळी सर्वाधिक संधी आपल्याला राहणार आहे. शिक्षण आणि कौशल्य
याचा सुरेख संगम साधून जगाला मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता असल्यामुळेच भविष्यातील
संधी ओळखूनच आपले क्षेत्र निवडा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘नीट’च्या अभ्यासासाठी व्हर्च्युल क्लासरुम
राज्यातील
विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षामध्ये कुठेही मागे राहणार नाही. यादृष्टीने नागपूर
जिल्हा डिजिटल जिल्हा जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीमध्ये
डिजिटल क्लासरुमची निर्मिती करण्यात आली असून डिजिटल बोर्डाद्वारे सर्वोत्तम
शिक्षण उपलब्ध होणार आहे.
नीटची
स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी 300 व्हर्च्युल
क्लासरुम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले
की, या व्हच्युअल क्लासरुममधून नीटचा ब्रीच कोर्श द्वारे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ
शिक्षकांचे मार्गदर्शन होणार आहे.
पारंपारिकतेतून
आपण पुढे न जाता नवीन तंत्रज्ञान शिका, असा हिातोपदेश करताना अज्ञानी राहणे हे
चुकीचे आहे त्यासाठी मनातील न्यूनगंड भिती दूर करा आणि स्वत:मध्ये आत्मविश्वास
निर्माण करा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
प्रारंभी
एज्युकेशन एव्ह्यन्यू या परिसंवादानिमित्त राज्यातील विविध शैक्षणिक संस्थाद्वारे
राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमा संदर्भातील तसेच व्यवसायिक संधी संदर्भातील
आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीच्या दालनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन
पाहणी केली. नवभारत वृत्तपत्र समुहातर्फे एज्युकेशन एव्ह्यन्यू या परिसंवादाचे
उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन झाले. प्रारंभी या वृत्तपत्र
समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निमीश माहेश्वरी यांनी स्वागत करुन प्रास्ताविक
भाषणात शिक्षणाच्या संधी व व्यवसायाची निवड या संदर्भात विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्याच्या हेतुने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्याना
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सेमिनार व कार्यशाळे
संदर्भात समुहाचे अध्यक्ष आसुतोष सलील यांनी माहिती दिली. श्री.बाजपेयी यांनी
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन संपादक संजय तिवारी यांनी मानले.
या कार्यशाळेस नागपूरसह विदर्भातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक व
पालक मोठ्या संख्येने उपस्थित हाते.
Post a Comment