नागपूर / भीमराव लोणारे /--
पावरग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत राज्यातील विविध सहा आरोग्य केंद्रांना रुग्णांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिन्याचे रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , आमदार डॉ.मिलिंद माने, माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, पावरग्रिड कारपोरेशनचे निर्देशक एस.के.गुप्ता, बी. अनंत शर्मा, एस. के. दबारे उपस्थित होते.
पावरग्रिड कारपोरेशन अँड इंडिया लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून राज्यातील सहा आरोग्य केंद्रातील रुग्णांची सोय व्हावी, त्यांना सुविधा तात्काळ मिळाव्या यासाठी राज्यातील नागपूर, वर्धा, पुणे, औरंगाबाद, ठाण (पडघे), बीड या आरोग्य केंद्राना पुरविण्यात आल्या आहेत.
राज्यात पावर ग्रिडच्या माध्यमातून सामाजिक दायित्वांतर्गत आरोग्याच्या पायाभूत सुविधा शिक्षण, पर्यावरण तसेच समाजातील कमकुवत वर्गाला कौशल्य विकासाकरिता विविध मार्गाने आर्थिक मदत केली जाईल, असेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment