भीमराव लोणारे / नागपूर /--
राज्यातील वीज हानी कमी करण्यासाठी कायम कार्यरत असलेले राज्याचे ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'आता वीज चोरांची खैर नाही' असा संदेश देत कामठी शहरात फ़िडर मॅनेजरची नियुक्ती करीत संपूर्ण देशापुढे आदर्श ठेवला आहे. आपल्या मतदारांमध्ये वीज बचतीची सवय लागावी, वीजेचा अधिकृत वापर वाढावा यासाठी ना. श्री बावनकुळे यांनी आपल्याच मतदार संघात फ़िडर मॅनेजरची नियुक्ती करीत इतर लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एकूण फिडरपैकी ८ हजार फिडर्सवर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वीजहानी होत आहे. शिवाय १ हजार ४६९ फिडर्सवर ४२ टक्क्यांपेक्षा जास्त हानी आहे. ही हानी कमी करण्यासाठी त्या वाहिन्यांवर फ़िडर मॅनेजर नियुक्तीचा निर्णय ना. बावनकुळे यांनी घेतला होता. राज्यातील अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांसोबतच आपल्या मतदार्संघातील वीजहानी अधिक असलेल्या कामठी शहरातील वाहिन्यांवरही फ़िडर मॅनेजर नियुक्त होऊन तेथील वीज ग्राहकांनाही शिस्त लागावी यासाठि ना. श्री बावनकुळे आग्रही होते. अनेकदा आपल्या मतदारांचे वायफ़ळ लाड पुरविणे, त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे काम अनेक लोकप्रतिनिधी करीत असतात, आपल्याकडील विभागाचा लौकीक वाढून भविष्यात कामठीची गणना सुसंस्कृत शहरात व्हावी, तेथील वीज वितरण व्यवस्था सशक्त व्हावी यासाठी ना. श्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने कामठी शहरातील अधिक वीजहानी असलेल्या चार आणि कन्हान शहरातील एका वाहिनीवर फ़िडर मॅनेजर नियुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. यानंतर झालेल्या पारदर्शी व स्पर्धात्मक निविदा प्रक्रीयेत यशस्वी ठरलेल्या मे. अंजनी लॉगिस्टिकची नियुक्ती करण्यात आली.
राज्यात ५ हजार ६४७ अकृषक फिडर्स आहेत. यातील १ हजार ४६९ फिडर्सवर ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व वितरण हानी होत आहे. वीजचोरी अधिक आणि वसुलीचे प्रमाण अधिक अशीच स्थिती इतर अनेक फिडर्सवर देखील आहे. अशा फिडर्सवरील हानी कमी करण्यासाठी व ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी फिडर मॅनेजर नेमले जात आहे. या योजनेमुळे सर्वाधिक भारनियमन असणार्या गटातील भारनियमन कमी करण्यास मदत होईल. या व्यवस्थापकास लघुदाब वीज ग्राहकाचे मीटर वाचन करणे, वीज बिल नोटीस वितरण करणे, वीजचोरी निदर्शनास आणणे, नवीन वीजजोडणी, थकबाकी वसुलीच्या कामात सहकार्य करणे तसेच सर्वसाधारण देखभालीची कामे दिली आहेत. यामुळे फिडर्सवरील तांत्रिक हानी कमी करण्यास व वसुली वाढविण्यास, ग्राहकाभिमुख सेवा देण्यास मदत होणार आहे.
फिडरवरून होणारी हानी कमी करीत ती १० टक्क्यांपर्यंत आणणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. हानी कमी झाल्यामुळे होणार्या महसूल वाढीच्या रकमेपैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल. शिवाय वितरण हानीत किंवा बिल वसुलीच्या क्षमतेत घट झाल्यास फिडर फ्रेन्चायझी व्यवस्थापकास देय असलेल्या रकमेच्या ५ टक्के रक्कम दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मे. अंजनी लॉगिस्टिकने दि. २ मे पासून कामठी येथील पाच वाहिन्यांची जवाबदारी स्विकारली असून त्यांनी अल्पावधीतच सुमारे ५ लाख रुपये मुल्याच्या २५ वीजचो-या उघडकीस आणल्या आहेत त्यापैकी एका ग्राहकाकडे तर तब्बल १ लाख ५५ हजाराची वीजचोरी पकडून त्याचेकडून वीजचोरी आणि दंडाची रक्कमही वसूल केली आहे. जवळपास एक हजार मीटर्सची तपासणी करण्यात आली असून पाच वाहिन्यांवर ३० कर्मचा-यांच्या मदतिने मे. अंजनी लॉगिस्टिकने ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला यशस्वी करीत कामठी आणि कन्हान येथील वाहिन्यांवरील वीज हानी कमी करण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले आहे.

Post a Comment