BREAKING NEWS

Tuesday, May 17, 2016

सूरक्षित वाहन चालविण्याचे महामार्ग पोलिसांचे आवाहन ...

अनिल चौधरी , पुणे :- (अमोल मराठे,महाड यांसकडून )

सुट्टी निमित्त कोकणात येणारे , मुंबई – गोवा महामार्गावर वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळता आगाऊपणाने ओव्हरटेकिंग करुण अपघाताला निमंत्रण देत आहेत.  महामार्गावर जराही वाहतूक हळूवार झाली कि, ओव्हरटेक करुण तसेच पुढे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकाला अडथळा निर्माण करत आहेत तसेच विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करुण येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडत आहे तेंव्हा वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुण सूरक्षित वाहन चालवावे असे आवाहनमहामार्ग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष ठाकूर यांनी केले आहे.  महामार्ग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई – गोवा महामार्गावर सुट्टीमुळे प्रचंड वाहतूक वाढली आहे.मुंबई ,पुणे,रायगड,निगडी,अहमदनगर,औरंगाबादतसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणावरून  येणाऱ्या समस्त; विशेषकरूनMH01,MH02,MH03,MH04,MH12,MH14व इतर बिगर MH06 MH08, MH07, MH 09 जिल्ह्यातील प्रवासी नागरिकाना एक नम्र विनंतीवजा सूचना आहे कि , कोकणातील रस्ते म्हणजे काही ४पदरी, ६पदरी एक्स्प्रेस हायवे नव्हेत. त्यामुळे आपण एक्स्प्रेस हायवे वर करत असलेले चाळे कृपया इथल्या रस्त्यांवर करू नये. इथले रस्ते प्रचंड वळणावळणाचे आणि चढ उतारांचे आहेत. अनेक स्पॉट तर इतके ब्लाइंड आहेत की समोरची गाडी अंगावर येईपर्यंत अजिबात अंदाज येत नाही की समोरून गाडी येत आहे.    एकतर सुट्ट्यांमुळे ट्राफिक प्रचंड वाढली आहे आणि त्यात इकडे पहिल्यांदाच येणाऱ्या लोकांना इथल्या रस्त्यांचा इंचभर सुद्धा अंदाज नसतो. अशा वेळी ओव्हरटेकिंग करताना काळजी घेतली तर ते आपल्याच हिताचं ठरेल. नको तिथे आगाऊपणा करायला जाऊन आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. टूरीस्ट वाहनांच्या चालकांनी तर जास्त काळजी घ्यायला हवी. तुमच्यावर विश्वास ठेऊन गाडीत बाकीचे प्रवासी गाडीत बसलेले आहेत याची जाण ठेवावी. या महामार्गावर वैद्यकीय सेवा ठराविक ठिकाणीच उपलब्ध असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाती निधन होणाऱ्याची संख्या जास्त आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करुण अपघात ग्रस्तांचे प्राण वाचवीत आहे . पण वारंवार वाहनचालकांच्या चुकीमुळे  अपघात घडत आहे . तेंव्हा आपण आपली तसेच आपल्या कुटुंबाची तसेच गाडीतील प्रवाशांची काळजी घ्यावी .     आपण कोकणात येता ते चार दिवस आनंदात आणि शांततेत व्यतीत करता यावेत म्हणून. त्यासाठी उगीच गडबड घाई करण्याची गरज नाही. यंदाच्या सुट्टी काळात डझनभर अपघात झालेले बघितले आणि त्यातील बरेचसे अपघात हे आगाऊपणाने ओव्हरटेकिंग करताना झालेले होते म्हणूनच वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुण  सूरक्षित वाहन चालवावे असे आवाहन महामार्ग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष ठाकूर व महाड शहर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक ए.वाय.मलिकयांनी केले आहे. सावकाश जा आणि सुरक्षित पोहोचा. येवा कोकण आपलाच आसा

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.