अनिल चौधरी,
पुणे :-
पुणे :-
पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या लाडक्या कलाकारांचे आवाजही आता
प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. हिंदीप्रमाणे मराठीतही हा ट्रेंड आता रुजू
होताना दिसत आहे. मराठीतील बिग बजेट सिनेमा व भन्साळी यांची निर्मिती
असलेला 'लाल इश्क़- गुपित आहे साक्षीला' या रोमँटिक, सस्पेन्स थ्रिलर
चित्रपटाची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच यातील 'चांद
मातला' हे स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी यांच्यावर चित्रित
केलेलं रोमँटिक गाणं प्रदर्शित करण्यात आले. रोमँटिक लोकेशन्स, कॉश्युम आणि
लाईट्स यातून पूर्णपणे भन्साळी टच असलेल्या या गाण्याला अल्पावधीतच सोशल
नेटवर्किंग साईटवर लाखो लाईक्सदेखील मिळाले आहेत. प्रत्येकाच्याच ओठी आता
हे गाण रुळलं आहे. 'चांद मातला'च्या या यशानंतर आता अमितराज यांच संगीत
असलेलं आणि तरुणाईचा लाडका आवाज असलेल्या आदर्श शिंदे यांनी गायलेलं 'चिमणी
चिमणी' हे गाण आले आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने सर्वांचा लाडका अभिनेता
स्वप्नील जोशी याचा सुरेल आवाज त्याने प्रथमच गायलेल्या या
गाण्यामुळे ऐकायला मिळणार आहे.
इतकेच नव्हे तर चित्रपटातील सर्वच कलाकार पियुष रानडे,
स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, आरती केळकर, कस्तुरी वावरे आणि खुद्द अमितराज
यानेही ते गायले आहे.
सचिन पाठक यांनी शब्दबद्ध केलेलं 'चिमणी चिमणी' हे
रिफ्रेशिंग गाण सर्वांना नक्कीच ठेका धरायला लावेल. आदर्शच्या भारदस्त
आवाजासह चॉंकलेट बॉय स्वप्नीलचा आवाज हे समीकरण म्हणजे त्यांच्या
चाहत्यांसाठी एक अनोखी पर्वणीच ठरेल.
चित्रपटाची गाणी जेव्हा चित्रित केली जातात तेव्हा अनेक
वेगवेगळे शॉट घेऊन ते एकत्र बांधले जातात. 'चिमणी चिमणी' हे गाणं येथेही
हटके ठरले आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या 'लाल इश्क'
मधील हे संपूर्ण गाणं एकाच शॉटमध्ये चि त्रित करण्यात आले आहे.
कोणत्याही रिटेकशिवाय एका दमात परफॉर्म करण्यासाठी कलाकार व नृत्य
दिग्दर्शकांनी अनेक दिवस तालीम आणि परिश्रम घेतले. असे हे सर्वच
बाजूने परिपूर्ण असलेले नवीन धमाकेदार गाणं ऐकायला आणि पहायला
प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
भन्साळी प्राॅडक्शन या बॅनरखाली संजय लीला भन्साळी यांची
निर्मिती व सहनिर्मिती शबीना खान यांनी केली आहे. सिनेमाची पटकथा तसेच
संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले असून येत्या '२७ मे' रोजी हा
चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Post a Comment