प्रवीण गोंगले / चंद्रपूर /--
चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून श्री आशुतोष सलील यांनी आज 17 मे 2016 रोजी डॉ. दिपक म्हैसेकर यांचेकडून कार्यभार स्विकारला आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे 2010 च्या बॅचचे आय ए एस असून चंद्रपूर येथे येण्यापूर्वी त्यांनी वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
जिल्हाधिकारी श्री सलील यानी यापूर्वी अमरावती येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर सुध्दा काम केले असून वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून जाण्यापूर्वी चंद्रपूर येथे त्यांनी उपविभागीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या विविध पदावर काम केले आहे. त्यामुळे त्यांना चंद्रपूर नवीन नसून चंद्रपूर जिल्हयांची संपूर्ण माहिती त्यांना अवगत आहे
Post a Comment