BREAKING NEWS

Monday, June 27, 2016

नवमानव बहुउद्देशिय संस्था ठरताय मनोरुग्णांसाठी नवसंजिवनी - आतापर्यंत 30 मनोरुग्णांना उपचारार्थ केलंय दाखल - भविष्यात पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा संस्थेचा मानस

प्रवीण गोंगले / चंद्रपूर /------


वाटेल त्या अवस्थेत रस्त्यावर भटकंती करणा-या मनोरुग्णांसाठी नवमानव बहुउद्देशिय संस्था नवसंजीवनी ठरत आहे. या संस्थेच्या नेतृत्वात काम करणा-या मार्निग वाॅक ग्रुपनं तिस-यांदा चंद्रपूर शहरात उपक्रम राबवुन 5 मनोरुग्णांना उपचारार्थ ताब्यात घेतलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडुन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तसंच, न्यायालयाच्या परवानगीनंतर या मनोरुग्णांना नागपुरच्या विभागीय मनोरुग्णालयात भरती करण्यात येणार आहे.

वार्डावार्डात तसंच रस्त्यावर नको त्या अवस्थेत भटकंती करणारे  खुप आढळुन येतात. त्यापैकी काही मनोरुग्ण असतात आणि या कारणामुळंच ते कुटंूबिय व समाजासाठी नकोसे असतात. त्यामुळं अशा मनोरुग्णांना समाजात जगण्यासाठी स्थान व हक्क मिळवुन देणं, या उदात्त हेतुनं नवमानव बहुउद्देशिय संस्थेचा जन्म झाला आणि याच संस्थेच्या प्रविण डाहुले यांच्या नेतृत्वात मार्निंग वाॅक ग्रुपनं एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला.

ही संस्था गेल्या काही महिण्यापासुन चंद्रपूर शहरात मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. 21 फेब्रूवारीला रामनगर पोलिस स्टेशनच्या मदतीनं 10 पुरुष व 4 महिला, अशा एकुण 14 इसमांना गोळा केले. गोळा केलेले इसम हे मनोरुग्ण असल्याचं प्रमाणपत्र मिळताच, त्यांना न्यायालयीन आदेशानुसार नागपुरच्या विभागीय मनोरुग्णालयात उपचारार्थ करण्यात आलं. यातील 3 मनोरुग्ण बरे झाले असून त्यांना त्यांच्या नातवाईकांकडे सोपविण्यात आलं.

यानंतर अशीच मोहीम 13 एप्रिलला राबवुन  चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 10 इसमांना गोळा केले आणि मग न्यायालयीन आदेशानुसार त्यांनाही मनोरुग्णालयात भरती करण्यात आलं. पोलिसांच्या मदतीनं ही संस्था अशाप्रकारे उपक्रम राबवित असून संस्थेचा हा उपक्रम 25 जुनला दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत राबविण्यात आला.

या मोहीमेत माॅर्निंग वाॅक ्रग्रुपच्या सदस्यांनी 5 पुरुष व 1 महिला, अशा एकुण 6 लोकांना गोळा करत, पुढील प्राथमिकता सुरु केली आहे. कोणीही जन्मजात मनोरुग्ण होत नाही तर, त्यामुळं योग्य उपचार मिळाल्यास त्यानाही इतरांप्रमाणं जगता येउ शकते आणि याच भावनिकेतेतुन नवमानव बहुउद्देशिय संस्था व माॅॅर्निंग वाॅक ग्रुपनं हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

आता या संस्थेचा चंद्रपूर पासुन 12 ते 13 किलोमिटर अंतरावर असलेल्या चकबोडी येथे पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. या माध्यमातुन पुर्णपणे दुरुस्त होणा-या पण, मागंपुढं कोणीही नसलेल्या इसमांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.