BREAKING NEWS

Monday, June 27, 2016

झेड पी समोर कंत्राटदारांचं साखळी उपोषण - अंतिम देयके द्या अन्यथा आमरण उपोषण करणार - कंत्राटदारांचा झेड पी प्रशासनाला इशारा

प्रवीण गोंगले / चंद्रपूर /------


पुर्ण झालेल्या कामाचे अंतिम देयके देण्यात यावं, यासह अन्य प्रलंबित मागण्यांना घेउन कंत्राटदारानी जिल्हा परिषदेसमोर 27 जुन पासुन 7 दिवसीय साखळी उपोषण सुरु केलं आहे. नारायण याचावाड आणि अशोक आक्केवार हे कंत्राटदार पहिल्या दिवशी उपोषणाला बसले.

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानअंतर्गत केंद्रीय अर्थ सहाय्य निधी व नक्षलग्रस्त योजनेद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे वर्ग खोली व संरक्षण भिंतीचे कामांना मंजुरी मिळाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व कामे वेळेत पुर्ण झाली.

सुमारे 6 ते 8 महिण्यापुर्वीच कामे पुर्ण करण्यात आली. पण त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनानं कामाचे अंतिम देयके मंजुर केले नाही. याबाबत कंत्राटदारांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. पण, निवेदनाची दखलच घेतल्या गेली नाही. त्यामुळं कंत्राटदारांनी 7 दिवसीय साखळी उपोषण सुरु केलं आहे.

पुर्ण झालेल्या कामाचे अंतिम देयके त्वरीत देण्यात यावं, देयके विलंब करणा-या अधिका-यावर कारवाई करावी, प्रलंबित देयकामुळं झालेल्या आर्थीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी, या मागण्यांना घेउन उपोषण सुरु करण्यात आलं आहे. यावेळी एका शिष्टमंडळानं मुख्य कार्यपालन अधिका-यांना निवेदन देउन, 7 दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.