BREAKING NEWS

Monday, June 27, 2016

चंद्रपुर जिल्ह्यात लावणार 20.49 लाख रोपे * स्वयंसेवी संस्था 4.93 लाख झाडे लावणार * 77 हजार 328 रोपांची अतिरिक्त मागणी

चंद्रपुर  : प्रवीण गोंगले /----


  पर्यावरणाच्या संतुलणासाठी 33 टक्के जमीनीवर वृक्ष असणे आवश्यक आहे. वृक्षांमुळे पर्यावरण मानवपुरक निर्माण होण्यासोबतच अनेक प्रकारे वृक्षांचा लाभ होतो. राज्यात हाच दृष्टीकोन समोर ठेवत दिनांक 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वनमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वच स्तरावरून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. तब्बल 20.49 लाख रोपे यादिवशी ‍जिल्ह्यात लावले जाणार आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची ही मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. ठिकठिकाणी चित्ररथ तथा फ्लेक्स, बॅनर व पोस्टरद्वारे वनविभागाच्यावतीने नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभाग, सामाजिक वणीकरण विभाग, वनविभाग महामंडळ व वन्यजीव अशा शासकीय विभागाच्यावतीने तब्बल 15 लाख 56 हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ठ आहे. त्याप्रमाणे खड्डेही खोदून पूर्व तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात शासकीय विभागांसह विविध सामाजिक संघटनाही वृक्ष लागवडीसाठी पुढे आले आहे. वन व संबंधीत विभागासह इतर शासकीय कार्यालये, उद्योग, स्वयंसेवी  संस्था, शिक्षण संस्था खाजगी व्यक्तींकडूनही तब्बल 4 लाख 93 हजार रोपे 1 जूलै रोजी लावले जाणार आहे.

जिल्ह्यातील सामान्य नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फुर्तपणे लाभत असलेला सहभाग व दररोज रोपांची होणारी मागणी पाहता आतापर्यंत 77 हजार 328 रोपांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे. शासकीय संस्था, इतर विभाग, अशासकीय संस्था यांची अतिरिक्त मागणी गृहीत धरून शासकीय यंत्रणा वगळता 5.70 लाख रोपे लावण्यात येणार आहे. जिल्ह्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेमध्ये 6 लाख 95 हजार रोपे उपलब्ध असून या ठिकाणाहून ते पुरविण्यात येणार आहे.

वनविभागाच्या रोपवाटीका रामबाग, चिचपल्ली, राजोली, गंधानाला, महालगाव, सावरगाव, कच्चेपार, घोडाझरी, एकारा, खडसंगी, सायगाठा, सुमठाणा, कारवा, झरण, गडचांदो येथे असून सामाजि‍क वनीकरण विभागाच्या रोपवाटीका चंद्रपुर, चांदापुर, देवपायली, खडसंगी, मोवाडा येथे आहे. या नर्सरीमधून रोपे पुरवठा करण्यात येणार असून आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार रोपांची टंचाई भासणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनासह सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने दिनांक 1 जूलै रोजी जिल्ह्यात विक्रमी वृक्ष लागवड करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे सामाजिक वनिकरण ‍विभागाच्या  उपसंचालकांनी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.