BREAKING NEWS

Wednesday, June 1, 2016

मनसे पदाधिकार्‍यांची हॉटेल मालकाला मारहाण - गाडी पार्किंग करण्यावरून वाद

अमरावती /---
 




आपल्या मित्रांचा  वाढदिवसाला गेलेल्या स्थानिक अमरावती मधील मनसेच्या पदाधिकार्‍यांनी चांदूर रेल्वे रोडवर हिल टॉप नामक गार्डन रेस्टॉरेंट मध्ये गाडी लावल्यास विरोध करणार्‍या हॉटेल मालकास बॅट आणि चाकुने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्यामुळे राजकीय पक्षांची दंबगगिरी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले. मारहाण करणार्‍यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरप्रमुखांच्या समावेश असल्यामुळे आधीच आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत असलेला मनसे हा पक्ष पुन्हा अडचणीत आल्याचे दिसून येते.
रोहित अजय गुडधे असे मारहाण झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे.  ते नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री आपल्या हॉटेलमध्ये कामात मग्न होते. दरम्यान निखिल अर्मळ यांचा वाढदिवस असल्यामुळे अर्मळ आपल्या मित्रासमवेत हॉटेलात जेवायला आले होते.
मात्र त्यांनी आपली चारचाकी वाहन हॉटेलच्या गार्डनमध्ये पार्किंग केली, त्यामुळे सदर जागा ही ग्राहकांच्या जेवणाची जागा असल्यामुळे हॉटेल मालकांनी गाडी बाहेर पार्ककरण्याचे सांगितले.
मात्र मनसे पदाधिकारी यांनी हॉटेल मालकाला न जुमानता वाद घालण्यास सुरुवात केली व या दरम्यान रोहित गुडधे यांना डोक्यावर बॅट मारली तर मागील भागाने कमरेवर सुरा मारून गंभीर जखमी केले.
तसेच त्यांच्या खिशातील १४ हजार ७00 रूपये आणि ३0 ग्रॅम सोन्याचे गळय़ातील चैन लंपास केली, विजय गुडधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संतोष बद्रे, निखिल अर्मळ, धिरज तायडे यांच्यासह तीन ते चार आरोपींना विरूध्द कलम १४८, १४९, ३२४ ,१४७, भादंवि आर/डब्ल्यू १३५ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहे.

Amravati News, vidarbha News

..................
लवकरच -
प्रधान मंत्री आवास योजना
नगर परिषद अचलपूर,जि.अमरावती

http://pmayachalpur.com/

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.