BREAKING NEWS

Thursday, June 16, 2016

यवतमाळ आणि वणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

यवतमाळ -

 

वणी येथील तहसील चौक आणि यवतमाळ येथील दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन पार पडले. या वेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांचा अनन्वित छळ करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, बालभारतीच्या इयत्ता ६ वीच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश भारताच्या नकाशातून वगळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, काश्मीरमधील हिंदूंच्या हरि पर्वत टेकडीचे कोह-ए-मारन नामकरण रहित करावे, या मागण्या करण्यात आल्या. यात वारकरी संप्रदाय, हिंदु महासभा, योग वेदांत सेवा समिती यांचेे कार्यकर्ते सहभागी झाले. या वेळी ३०० ते ३२० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या.     ह.भ.प. शिरभाते महाराजांचा आशीर्वाद धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांच्या पाठीशी आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी वारकरी संप्रदाय, हिंदु महासभा, योग वेदांत सेवा समिती, तसेच धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी परिश्रम घेतले.
ॐ विना योग नाही आणि योगाविना ॐ नाही ! - लक्ष्मणलाल खत्री, हिंदु महासभा
ॐ विना योग नाही आणि योगाविना ॐ नाही. निद्रिस्त हिंदु समाजाला जागृत करणार्‍या हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना आहेत. तेे तुमच्या दारी आल्यावर त्यांना तन, मन, धन यांनी सहकार्य करा. त्यांच्या पाठीशी उभे रहा !

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.