पीत
पत्रकारिता म्हणजे वस्तूनिष्ठ वार्तांकन न करता लोकांचे लक्ष आकर्षित
करण्यासाठी सनसनाटी वृत्ते प्रसारित करणारी, नैतिकतेला धरून नसणारी, खप
वाढवण्यासाठी खोटी वृत्ते प्रसारित करणारी पत्रकारिता होय !
१ जून २०१६ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सनातनचा देवद (पनवेल) येथील आश्रम, सनातन संकुलातील एक साधकाचे निवासस्थान आणि पुणे येथील एका साधकाचे निवासस्थान यांची झडती घेतली. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने काही घोषित करण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते आणि कथित पत्रकार आशिष खेतान यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती याच सहभागी असल्याचे ट्विट केले !
सीबीआयने घातलेल्या छाप्याच्या घटनेचे वार्तांकन करतांना दैनिक सामना, दैनिक वार्ताहर आणि एखाद-दुसर्या सन्माननीय दैनिकाचा अपवाद वगळता दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी, तरुण भारत, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रांनी, तसेच काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता केवळ आशिष खेतान यांच्या ट्विटच्या आधारे सनातनला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. वरील घटनेचे वृत्त प्रसारित करतांना वरील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी सनातन संस्थेवर सीबीआयचे छापे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन तपासात पुढचे पाऊल, हत्येचा कट पनवेलमध्ये शिजला ? अशा प्रकारचे कपोलकल्पित, तथ्यहीन आणि आधारहीन वृत्ते प्रसारित करून सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेची नाहक अपकीर्ती केली.
या प्रकरणात प्रत्यक्षात ५ दिवस उलटल्यानंतरही सीबीआयने सनातन संस्थेच्या एकाही साधकाला अटक केलेली नाही कि सीबीआयने कोणताही खुलासा केलेला नाही. प्रत्यक्षात काहीच घडलेले नसतांना प्रसिद्धीमाध्यमांनी पराचा कावळा करत धादांत खोटी वृत्ते देण्यातच धन्यता मानली. अशा पत्रकारितेमुळेच समाजात दिवसेंदिवस वर्तमानपत्रांची विश्वासार्हता अल्प होत आहे. अशी पीत पत्रकारिता समाजाला कधीतरी दिशा देईल का ?

१ जून २०१६ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सनातनचा देवद (पनवेल) येथील आश्रम, सनातन संकुलातील एक साधकाचे निवासस्थान आणि पुणे येथील एका साधकाचे निवासस्थान यांची झडती घेतली. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने काही घोषित करण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते आणि कथित पत्रकार आशिष खेतान यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती याच सहभागी असल्याचे ट्विट केले !
सीबीआयने घातलेल्या छाप्याच्या घटनेचे वार्तांकन करतांना दैनिक सामना, दैनिक वार्ताहर आणि एखाद-दुसर्या सन्माननीय दैनिकाचा अपवाद वगळता दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी, तरुण भारत, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रांनी, तसेच काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता केवळ आशिष खेतान यांच्या ट्विटच्या आधारे सनातनला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. वरील घटनेचे वृत्त प्रसारित करतांना वरील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी सनातन संस्थेवर सीबीआयचे छापे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन तपासात पुढचे पाऊल, हत्येचा कट पनवेलमध्ये शिजला ? अशा प्रकारचे कपोलकल्पित, तथ्यहीन आणि आधारहीन वृत्ते प्रसारित करून सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेची नाहक अपकीर्ती केली.
सनातनचा पूर्ण खुलासा प्रसारित करण्याचेही सौजन्य न दाखवणे !
या घटनेनंतर सनातनने त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन संस्थेची सविस्तर
भूमिका समाजासमोर मांडली. सनातनची अपकीर्ती करणार्या प्रसारमाध्यमांनी
सनातनची भूमिका केवळ ४ - ५ ओळींतच प्रसारित केली. यानंतर डॉ. हमीद दाभोलकर,
तसेच विरोधी पक्षनेते विखे पाटील आदींच्या प्रतिक्रिया वाहिन्यांवर
दाखवण्यात आल्या. या प्रकरणात प्रत्यक्षात ५ दिवस उलटल्यानंतरही सीबीआयने सनातन संस्थेच्या एकाही साधकाला अटक केलेली नाही कि सीबीआयने कोणताही खुलासा केलेला नाही. प्रत्यक्षात काहीच घडलेले नसतांना प्रसिद्धीमाध्यमांनी पराचा कावळा करत धादांत खोटी वृत्ते देण्यातच धन्यता मानली. अशा पत्रकारितेमुळेच समाजात दिवसेंदिवस वर्तमानपत्रांची विश्वासार्हता अल्प होत आहे. अशी पीत पत्रकारिता समाजाला कधीतरी दिशा देईल का ?
Post a Comment