जळगाव -
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मे २०१६ या दिवशी न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांचे नाव वगळण्यात आले आहे. या आरोपपत्रानुसार साध्वी आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. गेली ८ वर्षे त्यांना कारागृहात डांबून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. साध्वींना धर्मभ्रष्ट करण्यापासून कर्करोगावर उपचारही मिळू न देण्यापर्यंत अमानुष छळ केला. मालेगाव स्फोटाच्या अन्वेषणाचे प्रकरण हे मोठे षड्यंत्र आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि त्यांना कारवाई करण्यास भाग पाडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी संबंधित सर्व राज्यकर्ते यांच्या विरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूजा जाधव यांनी केली. या वेळी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनीही या मागणीला अनुमोदन दिले.

Post a Comment