मुंबई -
सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर अद्याप मुख्य अन्वेषणा यंत्रणा सीबीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांना त्यांच्या सूत्रांचा हवाला देऊन काही प्रसारमाध्यमांतून खोट्या कथा रचून त्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सर्व कथा कशा खोट्या आहेत, हे सर्व पत्रकारांसमोर पुराव्यांसह आणण्यासाठी शुक्रवार, १७ जून २०१६ या दिवशी सनातन संस्था आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अधिवक्त्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकार परिषदेत सनातनच्या अपकीर्तीचे कारस्थान उघडकीस आणणारे सज्जड पुरावे आम्ही एकत्रितपणे पत्रकारांसमोर मांडू. यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य पत्रकारांसमोर येईल. तसेच काही निवडक सनातन विरोधक आणि काही सुपारीबाज पत्रकार यांचे बिंग उघड होईल, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, जनतेपुढे तुटक आणि तुकड्यांच्या स्वरूपात विपर्यस्त वृत्त येऊ नयेत अन् सुस्पष्ट भूमिका मांडली जावी, तसेच या संदर्भातील पुरावे गोळा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने ही पत्रकार परिषद होईपर्यंत डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या विषयीच्या खोट्या कथांवरून घेतल्या जाणार्या चर्चांत सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. १७ जून या दिवशी होणार्या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे खुलासेवार देण्यात येतील. सनातन संस्थेने केवळ आरोपांच्या भयाने कोणत्याही दडपणाखाली न रहाता आजवर खुलेपणाने सर्व पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. असाच संवाद या पत्रकार परिषदेत केला जाईल.

Post a Comment