प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यावर दारू तस्कर विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. मालवाहू वाहने असो वा भाज्यांचे ट्रक. व्यावसायिक वाहने देखील अवैध दारू तस्करांचे आवडते साधन ठरले आहे. मात्र आता दुचाकीच्या विविध भागात खास कप्पे तयार करून दारू तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी २ दुचाकीतून तस्करी होणारी ३०० बाटल्या दारू जप्त केली आहे.
चंद्रपूर पोलिसांनी दारू तस्करी करण्याची आणखी एक नवीन शक्कल उघडकीस आणली आहे. रामनगर पोलिसांना आज सकाळी नागपूर मार्गावर २ दुचाकी गाड्या ताब्यात घेतल्या ज्यामध्ये मोठ्या शिताफीने दारू लपवून ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे दुचाकी गाडीत दारू तस्करी साठी विशेष जागा नसतांनाही या महाभागांनी या गाडीमधल्या प्रत्येक भागाचा दारू तस्करी साठी मोठ्या खुबीने वापर केला होता. मात्र एका खबरीच्या माध्यमातून पोलिसांना या तस्करीचा सुगावा मिळाला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात २ आरोपींना अटक केली असून ४० हजारांची दारू जप्त केली आहे. दुचाकीचा वापर करून दारू तस्करी करण्याच्या या प्रकरणाचा छडा लागला असला तरी अशा किती दुचाकी दारू तस्करीत गुंतल्या असतील अशी शंका निर्माण झाली आहे

Post a Comment