चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, अमरावती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, आमला विश्वेश्वर चा उत्कृष्ट निकाल लागला असुन एचएससी व्होकेशनल शाखेतून काविश अनिल सहारकर याने ८० टक्के व कला शाखेतुन समरीन अनिस खॉन पठाण हीने ७२.६१ टक्के गुण मिळवुन महाविद्यालयातून अव्वल स्थान पटकविले.
बारावीच्या परीक्षेत कला शाखेचा ८२.५३ टक्के निकाल लागला असुन ६३ पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एचएससी व्होकेशनल शाखेचा ६८.२५ टक्के निकाल लागला असुन ६३ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतुन अंकिता महादेव शेंडे ७१.३८ टक्के, रूपाली गजानन वेखंडे ७०.३० टक्के, पुजा भाष्कर डहाके ६९.०७ टक्के व पल्लवी मारोतराव सोनवने हीने ६८.९२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. एचएससी व्होकेशनल शाखेतुन अक्षय मनोहर मस्के (M Tecnology) ७१.३८ टक्के, ऋषीकेश अशोक मेश्राम (इलेक्ट्रीकल Tecnology ) ७०.३१ टक्के, शोयबखा हसनखा पठाण (इलेक्ट्रीकल Tecnology) ६९.५३ टक्के व मनोज विजय गवई (Machanical Tecnology) याने ६६.७७ टक्के गुण प्राप्त करीत यश संपादन केले.
Post a Comment