
पू. (कु.) स्वाती खाडये यांना महर्षींनी विचारले, महाकालेश्वराच्या क्षेत्रात (उज्जैन येथील सिंहस्थपर्वात) साधकांना विजय मिळाला ना ? प.पू. गुरुदेवांना काळजी होती. साधक कसे आहेत ? आपण जेव्हा १८ वर्षांच्या होता, तेव्हा आपण गुरुदेवांच्या चरणी आलात. आपल्यामुळे महाकालेश्वराच्या क्षेत्रात साधकांचे रक्षण झाले. आपली भक्ती एवढी आहे की, आपल्यासाठी प.पू. गुरुदेव एवढेही करणार नाहीत का ? एवढ्या वादळातही प.पू. गुरुदेव आपले रक्षण करतील, अशी आपली श्रद्धा होती का ? (पू. (कु.) स्वाती खाडये यांनी श्रद्धा होती, असे उत्तर दिले.)
पू. (कु.) स्वाती खाडये सिंहस्थ क्षेत्रात आपल्याला केवळ विजयच मिळालेला नाही, तर आपण दिग्वियजी आहात.
२. आपल्याला
केवळ प्रार्थना करायची आहे
उज्जैन येथील आपत्काळात आपण श्रीगुरूंचे स्मरण केले; ज्या खांद्यांवर साधक बसले होेते, ते खांदे कुणाचे होते ? ते दुखले नसतील का ? दुर्वास ऋषी भोजनाला आले, तेव्हा कुठे द्रौपदी होती अन् कुठे कृष्ण होता ? तरीही त्याने द्रौपदीचे साहाय्य केलेच ना ! आपल्याला केवळ प्रार्थना करायची आहे.
Post a Comment