सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) -

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त १८.५.२०१६ पासूनच महर्षींच्या आज्ञेने येथील सनातन आश्रमात केलेल्या धार्मिक विधींचा वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त १८.५.२०१६ पासूनच महर्षींच्या आज्ञेने येथील सनातन आश्रमात केलेल्या धार्मिक विधींचा वृत्तांत येथे प्रसिद्ध करत आहोत.
१८.५.२०१६
अमृतमहोत्सवाच्या सिद्धतेसाठी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील
पुरोहितांच्या हस्ते देवतांना श्रीफळ आणि तांबूल (विडे) अर्पण करून
प्रार्थना करण्यात आली.
२६.५.२०१६
सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी वेदमंत्रपठण केले.
पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते देवतांना नारळ आणि विडे अर्पण
करण्यात आले. या वेळी पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सर्व विधी निर्विघ्नपणे
पार पडावेत, यासाठी देवतांना प्रार्थना केली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते संकल्प
या विधींचा संकल्प परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात
आला. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने माझा
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) महामृत्यूयोग टळावा, भारतासह पृथ्वीवर
सर्वत्र विश्वकल्याणार्थ कार्यरत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, अनिष्ट
शक्तींमुळे सनातनच्या साधकांना होणारे त्रास आणि सनातनच्या धर्मप्रसाराच्या
कार्यात येणारे अडथळे यांचे निवारण व्हावे, धर्मप्रसाराचे माध्यम असलेली
सनातनची हिंदू दूरचित्रवाहिनी कार्यान्वित व्हावी आणि महर्षि अध्यात्म
विश्वविद्यालय कार्यान्वित व्हावे, असे संकल्प करण्यात आला. हळदीच्या
गणपतीचे पूजनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यजमानपद पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भूषवले.
सामवेद आणि अथर्ववेद यांचे पारायण
२६ मे ते २९ मे या कालावधीत सामवेद आणि अथर्ववेद यांचे पारायण करण्यात
आले. बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील योगीराज वेदविज्ञान आश्रमाचे
अहिताग्नि सोमयाजी चैतन्य काळेगुरुजी आणि अन्य सहकारी ऋत्विज वेदमूर्ती
पंकज पाठक यांनी हे पारायण केले.
२८.५.२०१६
महागणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण,
प्रधान देवतांचे आवाहन, त्यांचे षोडशोपचार पूजन, अग्निस्थापना, नवग्रह होम,
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळण्यासाठी आयुषयाग, श्री
महालक्ष्मी याग आणि शत्रूसंहार याग, तसेच रुद्र स्वाहाकार करण्यात आले. याच
वेळी ११ नद्यांतील तीर्थाचे पूजन करण्यात आले. व्यासकुंडातील तीर्थाचेही
पूजन झाले.
२९.५.२०१६
दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी सुदर्शन यागांतर्गत गायत्रीमंत्राने १००८ संख्येचे हवन करण्यात आले.
संतांच्या वंदनीय उपस्थितीतील पूर्णाहुतीने यागांची सांगता !
धार्मिक यागांची पूर्णाहुतीने सांगता झाली. पू. डॉ. मुकुल गाडगीळ,
पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते
पूर्णाहुती देण्यात आली. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वंदनीय
उपस्थिती लाभली. पुणे येथील प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पू. डॉ. ॐ
उलगनाथन्, प.पू. दास महाराज, पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, पू. श्रीमती
विजयालक्ष्मी काळेआजी यांचीही उपस्थिती होती. सर्व संतांनी यज्ञकुंडास
प्रदक्षिणा घालून यज्ञनारायणाला नमस्कार केला.
पूर्णाहुतीला महर्षि उपस्थित असल्याची मिळालेली साक्ष !
पूर्णाहुती चालू असतांना देवतांना वाहिलेले कमळाचे फूल खाली पडले.
तेव्हाच यज्ञस्थळावरून अगदी जवळून एक विमान गेले. पूर्णाहुती झाल्यानंतर
महर्षींनी सांगितले, आम्ही पुष्पक विमानातून येतो. ते सूक्ष्मातून
असल्यामुळे साधकांना कळत नाही. त्यामुळे आम्ही यज्ञस्थळी उपस्थित होतो,
याची साधकांना साक्ष मिळावी, यासाठी आम्ही कलियुगातील विमानाच्या
माध्यमातून ही साक्ष दिली आहे. लडाख येथे झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी
सांगितले होते की, आम्ही पुष्पक विमानातून येऊ. त्याची प्रत्यक्ष साक्ष आज
विमानाच्या माध्यमातून मिळाली.
महर्षि पुढे म्हणाले, आज गजकेसरीयोग आहे. आजच्या दिनी ज्याप्रमाणे
नक्षत्रे अन् ग्रहगती आहे, तशी स्थिती आणि असा शुभदिन पुढील १२० वर्षे
येणार नाही. अशा शुभदिनी हा याग झाला आहे.
Post a Comment