चंद्रपूर/ प्रवीण गोंगले /---
- इरई नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण, बाबुपेठ उड्डानपूल व दाताळा पुलाचे बांधकाम यासह जिल्हयातील विविध विकास कामाचा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत नियोजित विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित विभागाला दिले.
यावेळी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, सभापती देवराव भोंगळे व अधिकारी उपस्थित होते.
इरई नदी सौंदर्यीकरण व दाताळा पुल बांधकामाचे सादरीकरण धाराशा कंपनीने या बैठकीत केले. दाताळा पुलाचे डिझाईन पालकमंत्री यांनी मान्य करुन चार महिण्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कामास सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी म्हाडाला दिले. 49 कोटी रुपये खर्च करुन म्हाडा दाताळा पुल उभारणार आहे. या पुलाचे बांधकाम अतिशय उत्तम दर्जाचे व्हावे असे निर्देश त्यांनी दिले.
इरई नदी सौंदर्यीकरणाबाबत पालकमंत्री यांनी निर्देश देतांना सांगितले की, रिव्हर फ्रंटचे काम अडीच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. उत्तम दर्जाच्या कंपन्यांना या कामासाठी आमंत्रित करुन त्यापैकी एक कंपनी निवडण्याचे त्यांनी सांगितले. नवीन चंद्रपूरच्या विकास कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल असे ते म्हणाले.
बाबुपेठ उड्डान पूलाचा एकूण खर्च 61 कोटी 57 लाख असून रेल्वे त्यांच्या भागातील विकास कामाचा खर्च करणार आहेत. हा खर्च 16 कोटी 31 लाख असून रेल्वेचा वाटा वगळता राज्य शासन 45 कोटी 26 लाख खर्च करणार आहे. या उड्डान पुलामुळे शहरातील 68 मालमत्ता बाधित होत असून या सर्वांची सहमती मनपाने घेतली आहे. काही विकास कामे मनपा सुध्दा करणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील रेल्वे प्रकल्पांची माहिती एकत्रित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून रेल्वे संदर्भातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, बांबु प्रशिक्षण केंद्र, वनअकादमी, इरई नदीचे सौंदर्यीकरण व खोलीकरण, वैद्यकीय महाविद्यालय, बाबुपेठ उड्डान पुल, स्व.बाबा आमटे अभ्यासिका, प्रियदर्शनी सभागृह नुतनीकरण, आर्ट गॉलरी, ताडोबा रस्ता, रामाळा तलाव सौंदर्यीकरण, चंद्रपूर पोंभूर्णा, मूल व बल्लारपूर येथे क्रीडा संकुल उभारणे व मामा तलावाचे खोलीकरण आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला. रामाळा तलावासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मामा तलावांची दुरुस्ती करण्यासाठी सुक्ष्म आराखडा तयार करावा असे ते म्हणाले.
चंद्रपूर शहरातील सर्व ओपन स्पेसचा सर्व्हे करण्याच्या सुचना पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिल्या. पावसाळयापूर्वी मनपाने नाले सफाई तात्काळ करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले

Post a Comment