नागपूर / श्री भीमराव लोणारे /---

भिवापूर तालुक्यातील कारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात जवळी येथे आज झालेल्या समाधान शिबिरात सातबाराची प्रमाणपत्रे मिळून विविध प्रकारचे साडे आठ हजार प्रमाणपत्रे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले, तर 676 शेतकऱ्यांना 6 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज खरीप हंगामासाठी वाटण्यात आले. यापुढे सर्व गावांमधील नळ योजनांना सोलर पंप लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शिबिरात केले.
भर उन्हात सुमारे पाच हजार गावकरी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या समाधान शिबिराला आमदार सुधीर पारवे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. सीईओ कादंबरी भगत, आनंदराव राऊत, नंदा नारनवरे, श्रीमती इंगोले, योगिता चिमूरकर व 22 ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
गाव समृध्द झाले तर देश समृध्द या थिमवर अधिकाऱ्यांनी या समाधान शिबिरासाठी काम केले. 22 गावांच्या सरपंच, उपसरपंचांना पालकमंत्र्यांनी व्यासपीठावर बोलावून सर्वांसमोर आपल्या गावातील समस्या मांडण्याची संधी दिली. बहुतांश सरपचांनी पाणीटंचाईची कामे, रस्त्यांची दुरुस्ती, पांदण रस्ते, वीज दुरुस्तीच्या समस्या, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी इमारत व स्मशान घाटाची मागणी केली. महावितरणच्या पायाभूत आराखडा-2 च्या कामांचा आढावाही यानिमित्ताने घेतला गेला.
प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकासमोर आपण केलेली कामे सादर केली. सिमेंटचे 25 रस्ते झाले असून 46 रस्त्यांची कामे सुरु असल्याची माहिती समोर आली. शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे कनेक्शन ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. पाणी पुरवठ्याच्या एकूण 38 नळ योजना कार्यान्वित आहेत. 6 गावांमध्ये नळ योजना नाही. कोणत्याही विभागाचे संबंधित अधिकारी गावात राहत नसल्याचे आढळले. मुख्यालय असलेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी राहावे असा आग्रह करण्यात आला. याशिवाय गावातील लोकांच्या समस्या सुटणार नाही असे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.
कारगाव जिल्हा परिषद सर्कलमधील 712 कर्जदार शेतकऱ्यांना 1 कोटी 54 लक्ष रुपयांचे सावकारी कर्ज माफ करण्यात आले 675 शेतकऱ्यांना त्यांचे गहाण असलेल्या वस्तू परत करण्यात आल्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहय योजनेचा लाभ 19 लाभार्थांना मिळाला असून या योजनेतून 3 लाख 80 हजार रुपये वितरीत करण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचा लाभ 217 कुटुंबांना मिळाला.
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेवर मार्च 2016 पर्यंत 1073.98 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यंदासाठी या प्रकल्पाला 367 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. या योजनेचे पंपगृहाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन अजून झाले नाही. ते वेगाने पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
<><> पालकमंत्री बावनकुळे <><>
समाधान शिबीर हे शासनाच्या योजना गावातील प्रत्येकपर्यंत पोहचवण्याचे, तसेच जनतेच्या समस्या शासनापर्यंत सोडवण्याचा एक प्रभावी उपक्रम म्हणून सिध्द झाल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
या शिबिरात 22 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मांडलेल्या समस्या तीन महिन्यात प्रशासनाने सोडवाव्या असे निर्देश देत पालकमंत्र्यांनी यंदा प्रत्येक गावात स्मशान घाट, ग्रामपंचायत भवन व अंगणवाडयांना इमारती बांधून देण्यात येणार आहे. तसेच जलसंधारण्याच्या कामावर जिल्हा नियोजन समितीतील 150 कोटी खर्च करण्यात येणार आहे. जिल्हयाची सिंचन क्षमता वाढविण्याचा आपला प्रयत्न आहे. जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, नरी पुनर्जिवन, पिण्याच्या पाण्याच्या योजना या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
सरपंचांनी 14 वित्त आयोगाच्या निधीतून गावातील पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेसाठी सोलर पंप लावा. त्यामुळे वीज बिलापासून नळ योजनेची सुटका होईल. सर्व गावांमध्ये एलईडी लाईट लावले जातील. शेतकऱ्यांनी कृषीसाठी सोलर पंप बसवावे. यात 50 टक्के शासन व 50 टक्के रक्कम शेतकरी देईल. यामुळे शेतकऱ्याला आठ तासापेशा जास्त कालावधीसाठी वीज उपलबध राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.
गोसीखुर्दची जबाबदारी आता केंद्र शासनाने घेतली असून या सरकारच्या काळातच गोसीखुर्द पूर्ण केले जाईल, महिला बचतगटासाठी नागपुरात मॉल व अन्य विषयाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष वेधले.
<>>
आ. सुधीर पारवे<><>
आमदार सुधीर पारवे मोखेबर्डी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमीन या प्रकल्पासाठी दिल्या. त्यांना पाचपट पैसे देण्याचे मान्य केले पण अजून निधी मिळाला नाही याकड लक्ष वेधले. 33 केव्हीचे 4 वीज उपकेंद्र भिवापूर तालुकयात व्हावे. जवळी व परिसराची लाईन जाणार नाही अशी व्यवस्था मंत्र्यांनी करावी. या भागात जलयुक्त शिवाराची कामे उत्कृष्ट झाली असल्याचेही आमदार पारवे म्हणाले.
<><> आनंदराव राऊत <><>
भाजपाचे नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आनंदराव राऊत म्हणाले, समाधान शिबिरामुळे एनर्जी मिळते. ई ग्रेडमध्ये असलेला हा भाग पालकमंत्र्यामेळे डी ग्रेडमध्ये आला. पालकमंत्र्यांनी या भागाला भरपूर निधी दिला. जवळी वीज उपकेंद्र 24 तास तीन फेजचे करण्याची मागणीही राऊत यांनी केली. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांचेही भाषण झाले.
जि.प. सीईओ कांदबरी भगत यांनी आमचा गाव आमचा विकास ही नवी योजना सांगितली. या योजनेत लोकांनी आपल्या कोणती कामे हवी आहेत ते सांगावे. त्यानुसार विकास आराखडा तयार होईल असेही सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, दर मंगळवार व शुक्रवारी दुपारी तालुक्यात कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरातून शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकेचे अधिकारी येथे उपस्थित राहतील. नरेगातून गावाचा विकास करा. सरपंचांनी मनात आणले तर ते गावांचा विकास करु शकतात, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Post a Comment