चंद्रपूर - / प्रवीण गोंगले /---
प्रतिक्षा यादीत समाविष्ठ असलेल्या पुर्ण व समाविष्ठ नसलेल्या गरजु कुटंूबास इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांना घेउन श्रमिक एल्गारतर्फे 15 जुनला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यानी, आंदोलन स्थळाला भेट देउन, इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देण्याचं आश्वासन दिलं.
महाराष्ट्र शासनाची इंदिरा आवास घरकुल योजना ही, पडक्या घरात व झोपडीत वास्तव्य करणा-या गरीब व दारिद्रय रेषेखालील कुटंूबासाठी आहे. पण, आजही ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील अनेक गोरगरिब कुटंूबांन या योजनेचा लाभ मिळाला नाही. 2002 ते 2007 च्या दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ठ असलेले गरजु लोकं आजही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळं या यादीतील पुर्ण लाभाथ्र्यांना घरकुल देण्यात यावं, 2002 मध्ये बि पी एल सव्र्हेच्या आधारावर कच्च्या घराची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. पण यादीत अनेक गरजु कुटंूबांचा समावेश नाही. तेव्हा या यादीत समाविष्ठ नसलेल्या पण गरज असलेल्या कुटंूबांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, ज्यांचं नाव प्रतिक्षा यादीत समाविष्ठ आहे, परंतु जागा उपलब्ध नाही, अशांना शासनाची जागा उपलब्ध करुन देण्यात यावी आणि सावली, मुल, पोंभुर्णा व गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणा-या घरकुल लाभाथ्र्यांना बांधकामाची रक्कम त्वरीत देण्यात यावी, या मागण्यांसाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील जनतेनी 15 जुनला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. याबाबत बोलताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यानी, निवारा ही मुलभुत गरज असून शासन व जिल्हा परिषद प्रशासनानं गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळवुन द्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यानी श्रमिक एल्गारच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी झेड पी च्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी एम राजेंदर सिंह उपस्थित होते. यानंतर बबनराव लोणीकर यानी संघटनेचं निवेदन स्विकारुन याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. तसंच झेड पी च्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यानीही याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन न्याय मिळवुन देण्याबाबत आश्वस्त केलं.
Post a Comment