गडचिरोली / रंगया रेपाकवार /---
जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज देसाईगंज (वडसा) येथे भेट दिली. येथे तहसील कार्यालयात झालेल्या एका बैठकीत विविध योजनांचा आढावा घेतला. खरिप पीक कर्ज आणि आधीच्या कर्जाची फेरआखणी वेळेत पुर्ण करण्यात यावी, याबाबत संबंधितांना निर्देश दिले.
आज जिल्हाधिकाऱ्यांनी देसाईगंज येथे घेतलेल्या या बैठकीतस अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी पी.ई. नाने, वनविभागाचे उपवनसंरक्षक होशिंग, तहसिलदार संजय चरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खरीप हंगामाची तयारी करतांना घ्यावयाच्या विविध बाबींवर त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पीक कर्जाचे फेरगठण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कामास प्राधान्य देऊन सर्व शेतकऱ्यांना या हंगामात पीक कर्ज लवकर प्राप्त करता यावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि अधिाकाऱ्यांनी गतिमान पध्दतीने काम करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिल्या.
या प्रसंगी धान खरेदी संदर्भात धान खरेदीदार व वाहतुक करणाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. वडसा येथील धान गोदामास त्यांनी यावेळी भेट दिली.
तालुक्यातील शंकरपुर येथील मंडळ कार्यालयास भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील कामकाजाचा आढावा घेतला.
ग्रामीण भागासाठी विविध योजना सुरु आहेत त्यासोबतच जनतेसाठी असणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.
*****
Post a Comment